लष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल

Why Do Army Soldiers Have Short Hair: तुम्हीही अनेकदा लष्करामधील सैनिकांना पाहिलं असेल. यापैकी जवळपास सर्वांचीच हेअरस्टाइल पाहिल्यास त्यांचे केस फारच छोट्या आकाराचे म्हणजेच बारीक असतात. पण असं का?

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 1, 2023, 12:00 PM IST
लष्करातील जवानांचे केस एवढे बारीक का असतात? कारण वाचून आश्चर्यचकित व्हाल title=
अमेरिका असो किंवा भारत अनेक देशांतील लष्करी जवानांचे केस बारीकच असतात

Why Do Army Soldiers Have Short Hair: आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण अशा अनेक गोष्टी पाहतो ज्या आपण जवळपास गृहीत धरतो. रोज आपण यापैकी अनेक गोष्टी पाहत असल्याने त्या सामान्य असल्याचं मानतो. आपण या गोष्टी इतक्या गृहीत धरलेल्या असतात की त्या अशा का याचा आपण कधी फारसा विचार करत नाही. अशाच गोष्टींबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते. एखाद्या व्यक्तीला अशाच रोजच्या जीवनाचा भाग झालेल्या गोष्टीबद्दल प्रश्न पडतो आणि मग त्याचं उत्तर या क्षेत्रातील व्यक्ती देते. यासाठीचा प्रश्नोत्तरांचासर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणजे क्वोरा! 

लष्करी जवानांचे केस बारीक का असतात?

याच प्लॅटफॉर्ममवर मध्यंतरी विचारण्यात आलेला एक प्रश्न लष्करी जवानांसंदर्भात होता. आपल्यापैकी अनेकांनी जेव्हा जेव्हा लष्करामधील जवानांना पाहिलं असेल तेव्हा एक गोष्ट प्राकर्षाने जाणवली असेल ती म्हणजे या जवानांची हेअरस्टाइल अगदी साचेबद्ध असल्यासारखी असते. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लष्करी जवानांच्या हेअरस्टाइल वेगवेगळ्या असल्या तरी केसांची लांबी ही फार नसते. अगदी बारीक केस कापलेली हेअरस्टाइलच जवान ठेवतात. मात्र जवान आपले डोक्यावरील केस एवढे बारीक का कापतात? अमेरिका असो, रशिया असो किंवा अगदी भारत असो सर्वच लष्करी सैनिकांबाबत ही गोष्ट प्राकर्षाने जाणवतं. मात्र लष्करी जवान एवढे छोटे केस ठेवण्यामागील नेमकं लॉजिक काय असतं? याबद्दलच नुकताच एक प्रश्न क्वोरावर विचारण्यात आलेला.

सलूनमध्ये आर्मी कट असते

केस कापण्यासाठी तुम्ही सलूनमध्ये गेल्यावर आर्मी कट नावाची एक हेअरस्टाइल असते. यामध्ये अगदी बारीक केस कापले जातात. काही इंच उंच असतील आणि हातातही येणार नाहीत एवढे नाजूक आकाराचे केस या हेअरस्टाइलमध्ये कापले जातात. अशीच हेअरस्टाइल सैनिकांचे असते त्यावरुनच या हेअरस्टाइलला नाव पडलं आहे. पण सैनिक एवढे बारीक केस का कापतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर सैनिकांच्या दिनक्रमामध्ये सापडतं.

मूळ कारण हे

जेव्हा युद्ध होतं तेव्हा सैनिक फारच व्यस्त असतात. अशावेळेस त्यांच्याकडे अगदी दैनंदिन गोष्टींसाठीही वेळ नसतो. सैनिकांचे केस अधिक लांबीचे असतील तर त्या माध्यमातून इतरांना वेगवेगळ्या आजारांचा संसर्ग होण्याचीही शक्यता असते. त्यामुळेच असा संसर्ग टाळण्यासाठी आणि कोणालाही इन्फेक्शन होऊ नये या हेतूने सैनिकांना केस कमी उंचीचे ठेवावेत असं सांगितलं जातं, असं क्वोरावर म्हटलं आहे.

ही कारणंही महत्त्वाची

तसेच युद्ध सुरु असताना सैनिकांना अनेक प्रकारची हत्यारं तसेच डोक्यावर हेल्मेट घालून वाटचाल करावी लागते. केस छोटे असतील तर घाईगडबडीत आणि कमी वेळात हेल्मेट डोक्यावर घालून ते बेल्टच्या मदतीने पॅक करता येतं. युद्धामध्ये सैनिक बंदुकींचा वापर करतात. युद्धामध्ये सैनिकांना लक्ष्याचा वेध घ्यावा लागतो. त्यामुळे केस लांब असतील तर लक्ष्याचा वेध घेताना त्यांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळेच या सर्व गोष्टींचा विचार करुन सैनिकांना केस छोटे ठेवण्यास सांगितलं जातं. 

(टीप - सदर माहिती सोशल मीडिया वेबसाईट क्वोरावरील युझर्सने दिलेली आहे. यापैकी काही प्रोफाइल्स या लष्कराशीसंबंधित निवृत्त व्यक्तींच्या आहेत.)