Husband Wife Relationship Tips: जीवन हे सुख-दुःखांच्या चढ-उतारातून जात असतं. अशावेळी आपल्या जोडीदारासोबतचं नातं चांगल्यापद्धतीने निभावणे कठीण होतं तेव्हा त्याचा परिणाम संपूर्ण आयुष्यावर होतो. जोडीदार हा जीवनात अतिशय महत्त्वाचा असतो कारण यामुळे तुमचं पुढील आयुष्य अवलंबून असतं, असे अनेक ज्येष्ठ मंडळी सांगतात. जोडीदारासोबतचं नातं फार चांगल नसेल तर काही लोकं त्या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतात. अशावेळी ती सगळी प्रोसेस आणि त्यानंतरचा कालावधीच हा नक्कीच तणावाचा असतो. जर या नात्याशी मुलं जोडलं गेलं असेल तर त्याचे परिणाम हे नक्कीच वेगळे असतात. अशावेळी तुम्ही आपल्या या घटस्फोटाच्या प्रक्रियेतून आणि त्या नात्यातून स्मूदपणे कसे बाहेर पडाल, हे तज्ज्ञांच्या मदतीने जाणून घ्या.
जोडीदारासोबतचं नातं कितीही कटू असलं तरीही वेगळं होण्याचा त्रास हा होतोच. तुम्ही एक कुटूंब म्हणून जगत असता अशावेळी तुम्ही त्या व्यक्तीशी जोडले गेले असता मग ते चांगल्या आठवणींनी किंवा वाईट आठवणींनी. Rebecca Hendrix जे लग्न आणि कुटुंब या विषयावर थेरपिस्ट म्हणून काम करतात. त्यांनी सांगितले की, जरी तुम्ही त्या व्यक्तीसोबत आनंदी नसलात तरी तुम्ही दोघं जोडले गेलेले असता हे नक्की. अशावेळी तुम्ही नवीन व्यक्तींशी संवाद साधा. आपण या परिस्थितीतून जात आहोत, याची कल्पना त्यांना द्या, असं तज्ज्ञ Hendrix सांगतात.
घटस्फोट झाला असला तरीही तुम्ही नवं नातं निर्माण करु शकता. Hendrix सांगतात की, तुम्हाला जुन्या नात्यातून दुःख मिळालं असलं तरीही तुम्ही ते नातं वेगळं करुन एक नवं नातं निर्माण करु शकता. हे नातं मैत्रीचं नक्कीच असू शकतं. मुलं असतील तर त्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतर या मुद्द्याचा विचार करावा. मुलांसाठी आपले मतभेद विसरुन एकत्र येणं हे शहाणपणाचं लक्षण आहे.
लग्न हे नातं संपवत असाल पण जर तुम्हाला मुलं असतील तर या सगळ्या प्रोसेसमधून बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी. Copareting Couple हा विचार जरी त्रासदायक असला तरीही Coparenting ही जबाबदारी महत्त्वाची आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. तुम्ही जोडीदार म्हणून एकत्र राहू शकत नसलात म्हणून तुम्ही पालक म्हणूनही विभक्त होणे गरजेचे नाही. मुलांसाठी एकत्र आल्यामुळे घटस्फोट या सारख्या तणावपूर्वक परिस्थितीतून नक्कीच शांतपणे बाहेर पडू शकता.
घटस्फोट ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल, पण हा घटस्फोट तुम्हाला जीवनाची चांगली बाजू दाखवून जाईल असं तज्ज्ञ म्हणतात. एक्सपर्ट मझूर म्हणजे की, “जेव्हा तुम्ही यासारख्या संकटातून किंवा शोकांतिका किंवा आघातातून जात असाल, तेव्हा त्यातून अर्थ काढणे हा एकमेव मार्ग आहे,”. या नात्यातून वेगळं होऊन तुम्हाला सकारात्मक काय मिळणार आहे, ही बाजू बघणे तितकीच गरजेची आहे.