जागतिक आदिवासी दिवसानिमित्त; त्यांचं जगणं सोपं नसतं... 'या' रानभाज्या तुम्ही खाल्ल्या आहात का?

Adivasi Divas : आज जागतिक आदिवासी दिवस. या निमित्ताने आपण त्यांच्या जगण्यातील, आहारातील रानभाज्यांची माहिती जाणून घेणार आहोत. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Aug 9, 2024, 03:46 PM IST
जागतिक आदिवासी दिवसानिमित्त; त्यांचं जगणं सोपं नसतं... 'या' रानभाज्या तुम्ही खाल्ल्या आहात का?  title=

जगभरात दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिन साजरा केला जातो. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दुरावलेल्या जगभरात राहणाऱ्या आदिवासींचा सन्मान करण्यामागे या दिवसामागे एक खास कारण आहे.

केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात, ज्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो. आपणास सांगूया की संयुक्त राष्ट्र महासभेने पहिल्यांदा 1994 हे आदिवासी लोकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले होते.

महाराष्ट्रातही मोठा आदिवासी वर्ग आहे. तसेच महाराष्ट्रातील आदिवासी लोकांचं जगणं वेगळे आहे. हे रानभाज्यांमधूनही अधोरेखित होतं. रानभाज्या म्हणजे रानमेवा. हा रानमेवा जंगल परिसरात सहज म्हणजे आपोआप उगवतो. याची कुणी ठरवून लागवड करत नाही. 

(हे पण वाचा - पावसाळ्यात आवर्जून खा आरोग्यदायी हंगामी भाज्या, अनेक पोषकतत्वांनी समृद्ध)

पावसाची रीपरीप सुरू झाली की, रानभाज्याही बाजारात डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले दर्दी त्या आवर्जून खरेदी करतात. प्रेमाने या भाज्या बनवून खाल्ल्या जातात. पाऊस सुरु झाला की या रानभाज्या रानमाळी कोणत्याही मेहनतीशिवाय आपोआप उगवतात. याच रानभाज्या आदिवासी लोकांच्या जगण्याचा एक भाग आहे. या कोणत्या त्याचे औषधी गुणधर्म काय जाणून घेऊया. 

रानभाज्या 

रानातील मेवा म्हणून अंबाडी, चिवळी, केना, शेवगा, सुरण, करवंद, आघाडा, टरोटा, पिंपळ, भूई आवळा, करटोली, राजगुरा, वाघाटे, फांदीची भाजी, कुंजीर भाजी, चमकुराचे पाने, काटसावर, जिवतीचे फुलं इत्यादी रानभाज्या आहेत. या रानभाज्यामध्ये पोषकतत्व भरपूर प्रमाणात असते. तसेच यामध्ये औषधी गुणधर्म तुमच्या शरीरासाठी अत्यावश्यक असते. श्रावणात या भाज्या बाजारात दिसतात. पावसाळा सुरु झाला की, या भाज्या रानात पाहायला मिळतात. अनेक आदिवासी लोक या रानभाज्यांचा आपल्या दिनक्रमाचा भाग म्हणून सहभाग करतात. 

एवढंच नव्हे तर अनेक आदिवासी महिला या रानभाज्या विकून आपला उदरनिर्वाह देखील करतात. कारण रानभाज्या शहरी लोकांना मिळणं तसं कठीण असतं अशावेळी बाजारात आदिवासी महिला या रानभाज्या विकायला येतात. या भाज्यांमध्ये वेगवेगळे प्रकार असतात. हे प्रकार सामान्यांना ओळखणे तसे कठिण असते. अशावेळी या महिलांची खूप मदत होते.