मिरारोड: काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव गुरुवारी सकाळी मिरारोड येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. मेजर कौस्तुभ राणे यांचे पार्थिव मिरारोडमध्ये आणले त्यावेळी नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यांचे पार्थिव सध्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. सकाळी १० वाजता मिरारोड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.
काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखताना मंगळवारी मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह चार जवान शहीद झाले. मेजर राणे यांचे पार्थिव बुधवारी श्रीनगर येथून विमानाने दु. २.१५ वाजता दिल्लीला पोहोचले. तिथून विमानाने ते संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. बुधवारी रात्रभर मालाड येथे शवगृहामध्ये ठेवण्यात आले होते.
Mumbai: Mortal remains of Major Kaustubh Prakash Kumar Rane who lost his life in Gurez Sector of J&K on August 7, arrives at his residence in Mira road area pic.twitter.com/bEqGmpamYa
— ANI (@ANI) August 9, 2018