आता ऑर्डर कॅन्सल केल्यास...; झोमॅटो लाँच करणार नवीन फीचर, CEO दीपेंद्र गोयल यांची घोषणा

Zomato Food Delivery: झोमॅटो लवकरच नवीन फिचर लाँच करणार आहे. या फीचरअंतर्गंत तुम्ही कोणतीही कॅन्सल केलेली ऑर्डर कमी दरात मिळवू शकता.   

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 11, 2024, 09:25 AM IST
 आता ऑर्डर कॅन्सल केल्यास...; झोमॅटो लाँच करणार नवीन फीचर, CEO दीपेंद्र गोयल यांची घोषणा title=
Zomato has a new plan to stop food wastage will add Food Rescue Feature

Zomato Food Rescue Feature: ऑनलाइन फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी एक फीचरची घोषणा केली आहे. या फिचरचे नाव  Food Rescue असं आहे. म्हणजेच जर एखाद्या युजर्सने त्याची ऑर्डर कॅन्सल केली तर झोमॅटो त्यांच्या जवळच्या ग्राहकांना ऑफर देईल की ते परवडणाऱ्या दरात ही ऑर्ड घेऊ शकतात. दीपेंद्र गोयलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. झोमॅटोवर आम्ही ऑर्डर कॅन्सल करण्याला प्रोत्साहन देत नाही, कारण यामुळं खूप अन्नाची नासाडी होते. 

झोमॅटोचे सीईओ दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लिहलं आहे की, कठोर नियम आणि कॅन्सलेशन पर नो रिफंड पॉलिसी असतानाही चार लाखाहून जास्त ऑर्डर्स ग्राहकांकडून विविध कारणांसाठी झोमॅटोकडून कॅन्सल करण्यात येतात. आमच्यासाठी, रेस्टॉरंट उद्योगासाठी आणि ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकांसाठी, आज आम्ही एक नवीन फिचर लाँच करत आहोत.   Food Rescue असं या फीचरचे नाव असून हे अद्याप लाँच करण्यात आलेले नाही. 

दीपेंद्र गोयल यांनी पोस्टमध्ये पुढे लिहलं आहे की, कॅन्सल केलेल्या ऑर्डर्स आता त्याच परिसरात असलेल्या ग्राहकांना दिसणार आहेत. या ऑर्डर्स त्यांना खूप कमी किंमतीत मिळणार आहे. त्यांच्या मूळ पॅकेजिंगसह आणि काही मिनिटांतच ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. रद्द केलेली ऑर्डर ग्राहकांच्या अॅपवर ऑर्डर घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी पार्टनरच्या 3 किमीच्या परिघात दिसेल. पण अन्नाचा ताजेपणा सुनिश्चित करण्यासाठी ऑर्डर घेण्याचा पर्याय फक्त काही मिनिटांसाठी उपलब्ध असेल. यावर झोमॅटोला सरकारी कर वगळता कोणताही फायदा होणार नाही.

दीपेंद्र गोयल म्हणाले की, आइस्क्रीम, शेक, स्मूदी आणि नाशवंत वस्तू  यासारख्या ऑर्डर या फिचरसाठी पात्र नसतील. त्याच वेळी, रेस्टॉरंट मालकांना पूर्वीप्रमाणेच मूळ रद्द केलेल्या ऑर्डरची भरपाई मिळणे सुरू राहील. यासोबतच नवीन फीचर अंतर्गत ऑर्डर घेतल्यास नवीन ग्राहकाने केलेल्या पेमेंटचा काही भागही मिळेल.

डिलिव्हरी पार्टनरला पूर्ण पेमेंट मिळेल

दीपेंद्र गोयल यांच्या मते, 'आतापर्यंत बहुतेक रेस्टॉरंट्सनी या सुविधेचा पर्याय निवडला आहे. ते त्यांच्या कंट्रोल पॅनलमधून हवे तेव्हा ते सहजपणे बंद करू शकतात. डिलिव्हरी पार्टनरला सुरुवातीच्या पिकअपपासून नवीन ग्राहकाच्या स्थानावर ड्रॉप ऑफ होईपर्यंत पूर्ण पैसे दिले जातील. तुमच्यासाठी रद्द केलेली ऑर्डर उपलब्ध असल्यास, तुमच्या होम पेजवर फूड रेस्क्यू आपोआप दिसेल.