Zomato funny Conversation: सोशल मीडियात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या काही व्हिडीओ सोशल मीडियात ट्रेण्डमध्ये आहेत. ज्यामध्ये गोलाकार बसलेली मित्र मंडळी गोलाकार बसून एकमेकांना टाळी देत 'एक मछली , पानी मे गिर गई- छपाक' हे वाक्य बोलतात. दुसऱ्या वेळेला छपाक हे वाक्य दोनवेळा बोलले जाते. पुढे तिसऱ्या, चौथ्या...असा खेळ सुरु राहतो. जो वाक्याची लय तोडेल तो आऊट होतो. अशा प्रकारचे अनेक रिल्स इन्स्टाग्रामवर व्हायरल होतायत. हाच ट्रेण्ड आता झोमॅटोने पकडलाय. याचा स्क्रिनशॉट वाऱ्यासारखा पसरलाय. त्याचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. काय घडलंय नेमंक? जाणून घेऊया.
झोमॅटो आपल्या कस्टमर्सना सेवा पुरवते. त्यामध्ये काही अडचण आल्यास अॅपच्या माध्यमातून तक्रार नोंदवण्याची मुभा देते. एक महिला आणि झोमॅटोमध्ये हलकाफुलका संवाद झाला. यामध्ये झोमॅटोने 'छपाक'चा ट्रेण्ड फॉलो केला. त्यामुळे सोशल मीडियातील यूजर्सचे लक्ष त्याकडे वेधले गेले. स्क्रिनशॉट व्हायरल झाल्यानंतर यावर मजेशीर प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.
झोमॅटोने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्क्रिनशॉट अपलोड केलाय. यामध्ये रितीका नावाची ग्राहक झोमॅटोशी बोलताना दिसतेय. तिने आपल्या लंचसाठी एक फिश फ्रायची ऑर्डर दिली होती. याला उत्तर देताना झोमॅटोच्या सोशल मीडिया टिमला छपाक असे उत्तर दिल्यापासून राहावले नाही.
झोमॅटोची सोशल मीडिया टीम आपल्या हलक्या फुलक्या अंदाजाने रिप्लाय करण्यासाठी ओळखली जाते. हा मजेशीर खेळ सुरु ठेवत झोमॅटोने छपाक असा रिप्लाय दिला. ही हलकी फुलकी चॅटींग व्हायरल झालीय. ट्विटरवर 3 लाखाहून अधिक जणांनी हा स्क्रिनशॉट पाहिलाय.
— zomato (@zomato) February 23, 2024
झोमॅटोचा हा मजेशीर अंदाज सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस आलाय. या व्हायरल पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये छान छान प्रतिक्रिया येत आहेत. एकाने लिहिले 'प्रिपेड ऑर्डर होती तर- पैसे, पाण्यात गेले, छपाक, छपाक' दुसऱ्याने तुम्ही कमाल लोकं आहात, असे म्हणत झोमॅटोचे कौतुक केलंय.
तर तिसऱ्या एका युजरने लिहिले, 'आणि या ट्रेण्डचे विजेते आहेत झोमॅटो' असे लिहिले. ज्यांनी हा गेम पाहिलाय, खेळलाय..त्यांना हा जोक कनेक्ट झालाय. तर अनेकांना झॉमेटोने ही काय मस्करी केलीय हेच कळायला मार्ग नाही.