Lok Sabha Election 2024 : गेल्या 10 वर्षात देशात भाजपने सत्ता चालवली आता लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Election) सध्या सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (ECI) लवकरच निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच आता आत्ताच्या क्षणी निवडणूक झाली तर सत्ता कोणाची येईल? कोणत्या राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच मॅट्रिझने ZEE NEWS साठी ओपिनियन पोल आयोजित केला. या मत सर्वेक्षणात (Zee News Opinion Poll) उत्तर प्रदेशातून धक्कादायक निकाल समोर आला आहे.
यूपी हे 15 कोटी मतदार आणि सर्वाधिक 80 जागा असलेले राज्य आहे. दिल्लीच्या सत्तेत जाण्याचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो, असं म्हणतात. त्यामुळे अनेक पंतप्रधानपदाचे उमेदवार उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवतात. अशातच आता आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची युती झाली असली तरी सूर जुळणं बाकी आहे. तर दुसरीकडे मोदी आणि योगी जोडीने उत्तर प्रदेशात चांगलीच धमक कमावली आहे. तसं पहायला गेलं तर युपीचे लोक धार्मिक मानले जातात. अशातच आता राम मंदिराचा प्रभाव येत्या निवडणूक दिसून येणार आहे.
ZEE NEWS आणि MATRIZE च्या सर्वेक्षणात NDA उत्तर प्रदेशात 78 जागांवर विजयी होताना दिसत आहे. तर भारत आघाडीला केवळ 2 जागा मिळाल्याचे दिसत आहे. म्हणजेच एनडीए आघाडीला येथे जवळपास एकतर्फी विजय मिळत आहे. सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 58 टक्के मते मिळत आहेत..त्यामुळे त्यांना 78 जागा मिळाल्या आहेत. तर भारत आघाडीला केवळ 32 टक्के मते मिळत आहेत..बसपाला 8 टक्के आणि इतरांना 2 टक्के मते मिळू शकतात.
दरम्यान, 36 टक्के लोकांनी योगींच्या कामाचा उल्लेख केला आहे. 26 टक्के लोक सुशासन आणि रेशन योजनेचं कौतूक करतात. तर 12 टक्के लोक डबल इंजिन सरकारचा उल्लेख करताना दिसले. 8 टक्के लोकं निवडणूक व्यवस्थापनाला कारणीभूत मानतात. तर 6 टक्के लोक जातीय ध्रुवीकरण आणि 2 टक्के इतर कारणे भाजपच्या विजयाचे कारण मानतात. तर 10 टक्के लोकांनी भाजप सरकारचा विरोध केला आहे.
DISCLAIMER: लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झी मीडिया आणि मॅट्रिझनं ओपिनियन पोल केला आहे. दोन्ही आघाडी स्थापन झाल्यानंतर आणि राज्यसभा निवडणुकीनंतर ही जनमत चाचणी घेण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 5 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आले आहे. या ओपिनियन पोलमध्ये लोकसभेच्या 543 जागांवर 1 लाख 67 हजार 843 लोकांची मतं घेण्यात आली. ज्यामध्ये 87 हजार पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. याशिवाय या ओपिनियन पोलमध्ये 27 हजार नवमतदारांची मतंही समाविष्ट करण्यात आली आहेत. ओपिनियन पोलच्या निकालांमध्ये एक ते दोन टक्क्यांचा फरक पडू शकतो. हे निवडणुकीचे निकाल नाहीत, हा फक्त ओपिनियन पोल आहे. हा ओपिनियन पोल म्हणजे कोणत्याही प्रकारे निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नाही.