मुंबई : तरुणाने (Young Man) वयाच्या 31 व्या वर्षी आयुष्य संपवलंय. सेंटू चक्रवर्ती असं या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार सेंटू आपल्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात जेवण बनवण्याचा कम करायचा. सेंटूच्या पत्नीचे पोलीस ठाण्यातील एएसआयसोबत (ASI) विवाहबाह्य संबध होते, असा आरोप सेंटूच्या नातेवाईकांनी केला आहे. सेंटूने पत्नीला एएसआयसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर पोलिसांनी त्याला मारहाण केली. यानंतर सेंटूने टोकाचा निर्णय घेतला. दरम्यान नातेवाईक सेंटुच्या मृतदेहासह पोलीस ठाण्याबाहेर (Police Station) आंदोलन करत आहेत. (young man ended his life due to wife extra marital affairs with asi at jharkhand)
"सिंटू आणि त्याची पत्नी निरसा पोलिस ठाण्यात काम करायचे. यादरम्यान पोलीस ठाण्यातील एएसआयसह सिंटूच्या पत्नीचं सूत जुळलं. याची माहिती सिंटूला झाली. या सर्व प्रकाराला वैतागून सिंटूने स्वत: ला संपवलं. या प्रकरणाची आम्ही गांभीर्याने तपास करतोय. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल" अशी प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस अधिकारी सुनील सिंह यांनी पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीनुसार दिली.
"माझ्या मुलाचं 7 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. एएसआय अविनाश कुमार यांच्यावरून सिंटू-निरसात वाद व्हायचे. निरसाने हा सर्व प्रकार एएसआयला सांगितला. त्यानंतर अविनाशने सिंटूला मारहाण केली. तेव्हापासून सिंटू अस्वस्थ झालेला. संतू हा पत्नीसोबत सासरच्या घरी राहत होता", अशी माहिती संतू चक्रवर्तीच्या आईने दिली. दरम्यान ही घटना झारखंडमधील धनबादमध्ये घडलीय.