घरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी ; करा 25-30 हजारांची कमाई

आता सरकार तुम्हाला घरबसल्या पैसे कमावण्याची संधी देत आहे. 

Updated: Mar 28, 2018, 12:48 PM IST
घरबसल्या पैसे कमवण्याची सुवर्णसंधी ; करा 25-30 हजारांची कमाई  title=

नवी दिल्ली : आता सरकार तुम्हाला घरबसल्या पैसे कमावण्याची संधी देत आहे. ही सरकारची कोणतीही योजना नाही. तर तुमच्या पर्सनल कारच्या साहाय्याने तुम्ही ही कमाई करु शकता. सरकार सध्या टॅक्सी परमिटच्या नव्या पॉलिसीचा विचार करत आहे. जर ही सुरू झाल्यास तुम्ही तुमची प्रायव्हेट कार ओला, उबरला लावू शकता आणि त्याद्वारे इन्कम मिळवू शकता. सरकार लवकरच यावर निर्णय घेईल अशी आशा आहे.

कारमधून मिळेल नियमित इन्कम

नवीन टॅक्सी परमिट नियमांनुसार तुम्ही कार ओला आणि उबरशी जोडून नियमित कमाई करु शकता. यातून तुम्ही 25 ते 30 हजारांपर्यंत कमाई करु शकता.

काय आहेत नियम?

टॅक्सी परमिटचे नियम काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे कार मालक आपली गाडी ओला, उबरसोबत अगदी सहज जोडू शकतात. त्यामुळे इच्छुकांना अप्रुव्हल आणि क्लियरन्स घेण्याशिवाय कमर्शियल वापरासाठी गाडीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. या सगळ्यासाठी तुम्हाला पैसे आणि वेळ खर्च करावा लागेल. त्याचबरोबर सगळ्यांना परमिट मिळेल असे नाही. 
अलिकडेच सरकारने या संदर्भातला रिपोर्ट बनवण्यासाठी एक टीम तयार केली आहे. टीमने रिपोर्ट बनवून सरकारला दिला आहे. सरकारने निती आयोगाच्या वेबसाईटवर ही सार्वजनिक केली आहे. सरकार पब्लिक ट्रान्सपोर्टला प्रेरणा देऊ इच्छिते. त्याचबरोबर सामान्य जनतेलाही उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, हा उद्देश आहे.

कशी होईल कमाई? 

ओला-उबरशी जोडल्यानंतर पीक अव्हर्समधेय कारची बुकींग होते. त्यावर सिंगल राईडसाठी 200 ते 250 रुपयांचे इंसेंटीव्ह मिळतात. ओला-उबरचे सर्व्हीस कॅटगरीमध्ये सकाळी 7 ते 12:30 आणि संध्याकाळी 5 ते 11 वाजेपर्यंतची वेळ ही पीक अव्हर्स मानली जाते. संपूर्ण दिवसात 12 राईड पूर्ण झाल्यास कंपनीच्या तर्फे ठरवून देण्यात आलेले इंसेंटीव्हज तुम्हाला मिळतील. ते 1000 रुपयांपर्यंत असू शकतात. जर 7 राईड्स पूर्ण झाल्यास कमीत कमी 700 रुपयांपर्यंतचा बोनस वेगळा मिळेल. 

एअरपोर्ट ड्रॉपसाठी वेगळा बोनस

एअरपोर्ट ड्रॉपसाठी ओला-उबर वेगळा बोनस देते. याशिवाय काही एक्सटर्नल बोनसही असतो. जो महिन्याला अकाऊंटमधेय ट्रान्सफर होतो. मात्र कंपनी वेळोवेळी बोनस आणि अन्य सर्व्हिसेसमध्ये बदल करत असते.