Sonu Sood helps Pallav Singh : दिल्लीतील एम्सच्या रांगेत उभ्या असलेल्या पल्लव सिंग (Pallav Singh) नावाच्या एका तरुणाने सोशल मीडियावर (social media) एक पोस्ट केली होती. आपल्या वडिलांच्या आयुष्यासाठी त्याने मदतीचा हात मागितला होता. या तरुणाच्या मदतीला (Medical Care) आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) धावून आला आहे. तरुणाची पोस्ट व्हायरल होताच सोनू सूदने त्याला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलंय. तुझ्या वडिलांना मरू देणार नाही. तु धीर धर, मला तुमचा नंबर थेट माझ्या वैयक्तिक ट्विटर आयडी इनबॉक्सवर मेसेज करा, अशी पोस्ट करत सोनू सूदने तरुणाला मदतीचा हात दिला आहे.
We won’t let your father die brother.
Message me ur number directly on my personal twitter id inbox .. kindly don’t share on a tweet. @SoodFoundation https://t.co/rkq8WuhvXu— sonu sood (@SonuSood) December 4, 2023
मी भारतीय मध्यमवर्गातील आहे, ज्यामध्ये भारतीय लोकसंख्येचा बहुतांश भाग येतो आणि मला हॉस्पिटलचं शेवटी असं बिल मिळालं आहे ज्याने मला गरीब होण्यापासून एक पाऊल दूर ठेवलंय. या वर्षी 15 सप्टेंबर रोजी पप्पांना हृदयविकाराचा झटका आला होता. माझ्या मूळ गावी, यूपीमधील देवरिया येथून जवळच्या केंद्र गोरखपूर येथे नेलं. त्यांना 3 धमन्यांमध्ये अडथळा आणि हृदयाचे कार्य फक्त 20 टक्के चालू असल्याचे निदान झालं आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस त्याला दिल्लीत आणलं. माझी बहीण AIIMS दिल्लीमध्ये हृदयरोगतज्ज्ञांना भेटण्यासाठी 24 तास रांगेत उभी राहिली. त्या दिवशी मी त्याला वाचवू शकेन असे मला वाटले नव्हते, पण सुदैवाने काहीही झाले नाही. त्यानंतर डॉक्टरांना भेटण्यासाठी आणखी २४ तास रांगेत उभं राहिलं लागलं. काही काळानंतर आम्हाला समजलं की हा रोग खूप गंभीर आहे आणि तातडीची शस्त्रक्रिया आवश्यक आहे. 45 दिवस खाजगी दवाखान्यात फिरलो आणि लक्षात आले की खाजगीरित्या शस्त्रक्रिया केली तर घर नाही तर आमच्याकडे जे आहे ते सर्व विकावं लागेल.
मी एका काउंटरवरून दुसर्या काउंटरवर किमान डझनभर चाचण्यांसाठी अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी धावतोय. मात्र मला दुसऱ्या महिन्याची तारीख दिली जातीये. माझ्या वडिलांना शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान 13 महिने प्रतीक्षा करावी लागेल. किमान एक लाख रुपये याला सांगितला आहे. आमच्याकडे माझ्या नोकरीशिवाय उत्पन्नाचा कोणताही मोठा स्रोत नाही. मी मंत्री किंवा कोण एक मोठा व्यक्ती असतो तर अनेकजण माझ्या मागे धावले असते. मात्र, मी एक सामान्य नागरिक आहे. पप्पा एक वर्ष, महिना किंवा आठवडा जगतील की नाही कल्पना नाही. माझे आई-वडील अस्तित्वात असावेत अशी माझी इच्छा आहे, अशी पोस्ट तरुणाने लिहिली होती.
My father will die, soon or very soon.
Yes, I know what I am saying.
I am writing this while standing in a queue at AIIMS Delhi
Please read .
— Pallav Singh (@pallavserene) December 4, 2023
दरम्यान, तरुणाच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. जर त्यांना मुंबईला आणता आलं तर मी उपचार घेईन पण वैद्यकीय परिस्थितीमुळे त्यांना प्रवास करायचा नसेल तर मी विनंती करतो की कोणत्याही खाजगी हॉस्पिटलला भरती कर, म्ही क्राउडफंडिंगद्वारे निधी उभारू, असं मुंबईतील समर्पण हॉस्पिटलचे कार्डियाक सर्जन डॉ. प्रशांत मिश्रा यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या पोस्टला अनेकांनी पसंती दिली असून लोकांनी त्यांचे आभार मानले आहेत. आपल्या देशवासीयांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, शिक्षण रुग्णालयात चांगले डॉक्टर तयार करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे माझे आभार मानण्याची गरज नाही, असंही डॉ. प्रशांत मिश्रा यांनी आपबिती सांगत म्हटलं आहे.
People are saying that doctor you are God and thanking me but let me tell you , i did MBBS from MGM Medical College Indore , fee was 480 rs for 6 months , I did MS from same college , fee was 12000 every year , I did MCh from KEM Hospital Mumbai , fees was 18000 every year , I… https://t.co/mwhGaJKmza
— Dr Prashant Mishra (@drprashantmish6) December 5, 2023