बुरखा घालून पोहोचल्या महिला मतदार, चेहरा दाखवण्यासाठी सांगितल्याने रडू लागल्या

बुरखा घालून मतदानाला आल्या महिला आणि...

शैलेश मुसळे | Updated: May 12, 2018, 06:40 PM IST
बुरखा घालून पोहोचल्या महिला मतदार, चेहरा दाखवण्यासाठी सांगितल्याने रडू लागल्या title=

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. कर्नाटक निवडणुकीत मतदानाला सुरुवात होताच मतदार मतदानासाठी बाहेर पडले. शनिवारी 222 विधानसभा जागांसाठी मतदान होतं आहे. 15 मेला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सुरवातीला सगळीकडे शांततेत मतदान झालं. पण नंतर काही ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. ईव्हीएम मशीन खराब झाल्याने देवेगौडा कुटुंबियांनी सुरुवातीला मतदान नाही करता आलं. कर्नाटकातील राजाजी नगर क्षेत्रात एका मतदान केंद्रावर लाईट गेल्य़ाने मतदान थांबलं होतं.

बेलागवी मतदान केंद्रावर नाट्य़मय घटना घडली. येथे एक महिला बुरखा घालून मतदानासाठी आली. मतदान महिला अधिकाऱ्यांनी महिलेला चेहरा दाखवण्यासाठी सांगितला. यानंतर काही महिला रडू लागल्या. अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर महिला अधिकाऱ्यांनी वेगळ्या क्यूबमध्ये त्यांची ओळख आणि मतदान आयडीवरची ओळख पटवली. त्यानंतर या महिलांना मतदानासाठी पाठवण्यात आलं. निवडणुकीदरम्यान बुरख्यावरुन वाद झाला. पण बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचललं.