कोरोनाविषयी महिलांसाठी सकारात्मक बातमी, अखेर महिला सर्वात आधी कोरोनाला हरवणार

 मुंबईतील, मुंबई सिव्हिल बॅाडी संस्थेने (Mumbai Civic Body) एक सर्वेक्षण केले आहे.

Updated: Apr 25, 2021, 02:34 PM IST
कोरोनाविषयी महिलांसाठी सकारात्मक बातमी, अखेर महिला सर्वात आधी कोरोनाला हरवणार title=

मुंबई : मुंबईतील, मुंबई सिव्हिल बॅाडी संस्थेने (Mumbai Civic Body) एक सर्वेक्षण केले आहे. त्यात महिलांमध्ये कोरोन व्हायरस सोबत लढण्यासाठी जास्त अँटीबॉडीज असल्याचे समोर आले आहे. या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये अँटीबॉडीज जास्त असतात. या सर्वेक्षणात असेही समोर आले आहे की, झोपडपट्टी नसलेल्या भागात सेरो पॉझिटिव्हिटी (Sero Positivity) वाढत होती, तर झोपडपट्टी भागात ती कमी होत आहेत.

या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, पहिल्या वेव्ह दरम्यान कोरोना रुगणांची संख्या इकती नव्हती जितकी ती, दुसर्‍या वेव्हमध्ये पहायला मिळाली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शनिवारी जाहीर केलेल्या महानगरपालिकेच्या सर्वेक्षणानुसार महिलांमध्ये सेरो-पॉझिटिव्हिटी 37.12 टक्के आहे, तर पुरुषांमध्ये ती 35.02 टक्के आहे.

झोपडपट्टी भागातील नगरपालिका दवाखान्यांमधून घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये 41.61 टक्के सेरो पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. एकंदरीत मुंबईत सर्व 24 प्रभागातील नागरिकांकडून घेण्यत आलेल्या10 हजार 197 रक्ताच्या नमुन्यांमध्ये 36.30 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली आहे.

कस्तुरबा रुग्णालय परिसरातील बीएमसीच्या मॉलिक्युलर बायोलॉजी प्रयोगशाळेत अँटीबॉडीजच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. गेल्या वर्षी जुलैमध्ये तीन प्रभागातील झोपडपट्टी भागात 57 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली होती. तर ऑगस्टमध्ये झोपडपट्टी भागात 45 टक्के सेरो-पॉझिटिव्हिटी आढळली आहे.

या सेरो सर्वेक्षणात यावर्षी मार्चमध्ये अनलिंक्ड एनोनिमस सॅम्पलिंग पद्धत वापरली गेली. यामध्ये त्या लोकांचे सॅम्पल घेतले गेले ज्यांनी कोरोना लस घेतली नाही. गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्टनंतर मार्चमध्ये घेण्यात आलेला हा तिसरा सर्वेक्षण आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x