नवी दिल्ली : कोरोना (Corona) प्रादुर्भावाचा परिणाम सर्व नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारावर झालाय. त्यात येत्या मे महिन्यात 12 दिवस बॅंक बंद (Bank Holiday) राहणार आहेत. बँकांसंबंधित व्यवहारांवर याचा परिणाम होणारेय. त्यामुळे बॅंकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. मेमध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत.
१ मे रोजी महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी कामगार दिन साजरा केला जातो. या दिवशी काही राज्यांच्या बँका बंद राहतील. त्याचबरोबर 2 मे रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील.
आरबीआयच्या वेबसाइटनुसार, मे महिन्यात (Bank Holidays List May 2021) एकूण 5 दिवसांसाठी बँक बंद असेल. काही सुट्ट्या या स्थानिक राज्य पातळीवर असतील. सर्व राज्यात ही 5 दिवसांची सुट्टी नसेल. कारण काही सण किंवा उत्सव संपूर्ण देशात एका वेळेस साजरे होत नाहीत.
बँक हॉलिडे व्यतिरिक्त महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार 8 आणि 22 मे रोजी आहे. या दिवशी बँकांमध्ये कोणतीही काम होणार नाही. याशिवाय 2, 9, 16, 23 आणि 30 मे रोजी रविवारी सुट्टी आहे.
कोरोनामुळे बँका केवळ 4 तास खुल्या असत देशात कोरोना संसर्गामध्ये सतत वाढ होतेय. हे लक्षात घेता भारतीय बँक असोसिएशनने (IBA) बँक संघटनांना सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बँक खुल्या ठेवण्याचा सल्ला दिला आहे.
आता सर्वसामान्यांना कामकाजासाठी बँकेची वेळ केवळ 4 तास असेल. या संदर्भात, आयबीएने सर्व राज्यस्तरीय बँकिंग समित्यांना पाठपुरावा करण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना पाठविली आहे. कोरोनामधील परिस्थिती सामान्य होईपर्यंत हे नियम असतील.