जमशेदपूर : वन्यजीवांची तस्करी (Wildlife trafficking) रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र अद्याप तरी हे कायदे करूनही तस्करी थांबलेली नाही. कारण आता अशीच तस्करीची घटना समोर आली आहे. या घटनेत एक महिला तब्बल 50 करोड किंमतीच्या वन्यप्राण्यांची तस्करी (Wildlife trafficking) रो करत होती. तिच्याजवळ 26 विदेशी साप, 12 सरडे आणि 300 कोळी होते. या वन्यजीवांना घेऊन ती तस्करी करत होती. मात्र पोलिसांनी ही तस्करी उधळून लावली.
टाटानगर आरपीएफ स्टेशन प्रभारी संजय कुमार तिवारी यांनी सांगितले की, त्यांच्या टीमला खरकपूर येथून माहिती मिळाली होती की निलांचल एक्स्प्रेसमधून एक संशयित महिला प्रवास करत आहे. ही महिला वन्यप्राण्यांची तस्करी (Wildlife trafficking) रो करत असल्याचीही माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. या महिलेची झडती घेतली असता कोट्यवधी रुपयांचे विदेशी वन्यजीव जप्त करण्यात आले.
#Jharkhand #tatanagarrailwaystation#jamshedpur#snake
जमशेदपुर में टाटानगर रेलवे स्टेशन पर 26 सांप, 12 गिरगिट और 300 मकड़ी और कीमत करोड़ों में.. pic.twitter.com/aJMeOWovvO— Sweta Gupta (@swetaguptag) November 7, 2022
आरपीएफच्या जवानांनी ट्रेनमधून 26 विदेशी साप, 12 रंग बदणारे सरडे आणि 300 कोळी याशिवाय इतर अनेक वन्यजीव (Wildlife trafficking) जप्त केले आहेत. निलांचल एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण बोगीतून एक महिला तस्कर हे वन्यप्राणी घेऊन जात होती. त्यावेळी पोलिसांनी सापळा रचून अटक केली.
पोलिसांनी वन्यप्राण्यांची (Wildlife trafficking) ओळख पटवण्यासाठी सर्पमित्राला बोलावले होते. यावेळी सर्पमित्राने महिलेकडून जप्त केलेल्या पिशवीतून सर्व वन्यप्राणी बाहेर काढण्यात आले. बॅगेत एकूण 26 साप, नऊ पॅकेज केलेले बीटल, 12 सरडे आणि सुमारे 300 कोळी सापडले होते. जप्त करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांपैकी एक साप आणि आठ सरडे मृत पावले होते. सर्व साप विषारी आणि परदेशी जातीचे असल्याचे सर्पमित्राने सांगितले आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या वन्यप्राण्यांची किंमत 50 कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेचे नाव देवी चंद्र आहे. ती मूळची पुणे महाराष्ट्राची आहे. पोलिसांच्या चौकशीत महिलेने सांगितले की, तिला नागालँडमधील एका व्यक्तीने वन्यजीवांनी भरलेली ही बॅग दिल्लीला नेण्यासाठी दिली होती.या कामासाठी तिला 10 हजार रूपये देण्यात आले होते. नागालँडहून ट्रेनने ती गुवाहाटीला पोहोचली आणि नंतर हावडाहून ट्रेनने हिजलीला पोहोचली. त्यानंतर तिथून ती निलांचल एक्स्प्रेसमध्ये बसून दिल्लीला जात होती. संपूर्ण प्रवासात ती नागालँडमधील त्या व्यक्तीच्या संपर्कात होती, असे तिने सांगितले आहे.
दरम्यान सध्या आरोपी महिला ही ताब्यात असून तिच्याकडील वन्यजीवांना (Wildlife trafficking) ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच आरपीएफने वनविभागाशी संपर्क साधून त्यांना आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करीच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. या प्रकरणात आणखीण धागेदोर पोलीस तपासत आहेत.