मुंबई : एटीएम फ्रॉडच्या (Atm Fraud) घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. या फ्रॉडमुळे खातेधारकांना मेहनतीने कमावलेला पैसा (Money) गमावण्याची वेळ येते. एटीएम वापरताना अनेक जण हलगर्जीपणा करतात. परिणामी फ्रॉड याचा गैरफायदा घेऊन रक्कम लाटतात. एटीएमधारकांची अशी फसवणूक होऊ नये म्हणून आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अलर्ट जारी केला आहे. (rbi reserve bank of india gived tips to atm holders while using card)
एटीएमचा वापर करणाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. सतर्कतेमुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक टाळता येऊ शकते. गंडा घालणाऱ्यांनी एटीएमशी छेडछाड करुन रक्कम बळकावण्यासह अनेक मार्ग शोधून काढले आहे. मात्र एटीएमयूजर्सने सतर्कता बाळगली तर होणारी फसवणूक टाळता येऊ शकते, असं आरबीआयने नमूद केलंय.
- एटीएमचा पासवर्ड लक्षात ठेवा. तो कुठेही लिहून वगैरे ठेवू नका.
-एटीएम पासवर्ड इतरांसह शेअर करु नका.
-एटीएम मशीनमध्ये बटनांवर हात झाकून पिन टाका. यामुळे मागे उभे असलेल्या व्यक्तीला पासवर्ड कळणार नाही आणि दिसणारही नाही.
- अनेकांना एटीएम कसं वापरायचं याबाबतचं ज्ञान नसतं. अशा व्यक्तींनी अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये.
- एटीएममधून बाहेर पडण्याआधी कॅन्सल (Cancel) बटण दाबायला विसरु नका. कार्ड आणि ट्रान्झेक्शन स्लिप घ्या.
- एटीएम कार्ड हरवल्यास बँकेला ताबडतोब माहिती द्या.
- कार्ड एटीएममध्ये फसल्यास किंवा कॅश न निघाल्यास तडक बँकेला हेल्पलाईनवर कॉल करा.