कोलकाता : क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याचीए पत्नी हसीन जहां यांच्यातील वाद अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये.
अशातच आता शमीची पत्नी हसीन जहां या प्रकरणातील प्रसारमाध्यमांच्या हस्तक्षेपामुळे परेशान आहे आणि मंगळवारी रागाच्या भरात तिने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन केल्याचं समोर आलंय. हसीनवर आरोप आहे की, प्रश्न विचारल्यावर तिने केवळ गैरवर्तनच नाहीतर एका वॄत्तवाहिनीचा कॅमेराही तोडला.
शमीवर इतर महिलांसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर शमीच्या पत्नीवर सतत प्रश्नांचा भडीमार होतो आहे. कोलकातामध्ये एक प्रश्न विचारल्यावर तर हसीनचा पारा इतका चढला की, एका वृत्तवाहिनीचा कॅमेरा तिने तोडला. हसीनचे वकील जाकिर एच हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मीडिया बळजबरीने मागे पडलाय आणि सोमवारीही त्यांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. प्रायव्हेट स्पेस काय आहे? हे प्रसारमाध्यमांना समजायला हवं. आम्ही आमच्या स्तरावर सर्व ठिक करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि पण माध्यमं याला एखाद्या युद्धाप्रमाणे दाखवत आहे’.
दरम्यान, मोहम्मद शमीच्या नातेवाईकांनी रविवारी त्याची पत्नी हसीन जहांचे वकिल जाकिर हुसैन यांची भेट घेतली. त्यांचा प्रयत्न हाच आहे की, दोघांमधील हे प्रकरण कोर्टात न जाता बाहेरच सोडवलं जातं. हसीने चर्चा करण्याची स्विकारलं आहे. पण याव्यतिरीक्त त्यांनी दुसरी काहीही माहिती दिली नाही.
हसीन म्हणाली की, मी शमी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून केल्या जात असलेल्या चर्चेच्या प्रयत्नांबाबत सतर्क आहे. प्रकरणाची चौकशी होत आहे. मला नाही माहिती की, आता चर्चा करून हा वाद मिटवला जाऊ शकतो. तक्रार देण्याआधी मी शमीला अनेक कॉल्स केले होते. पण त्याने उत्तर दिलं नाही. आता मला काही बोलायचं नाही. त्यांनी माझ्या वकिलांशी बोलावं’.