१ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त पण...

१ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Mar 13, 2018, 04:09 PM IST
१ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त पण...  title=

पटणा : १ एप्रिलपासून सगळे पूल टोलमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हा निर्णय महाराष्ट्र सरकारनं नाही तर बिहार सरकारनं घेतला आहे. बिहार सरकारच्या या निर्णयामुळे तिथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र टोलमुक्त कधी?

बिहारमधले सगळे पूल टोलमुक्त होत असतानाच महाराष्ट्र सरकार हा निर्णय कधी घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय. सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजप सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर काही रस्ते टोलमुक्तं करण्यात आले पण अजूनही सरसकट टोलमुक्ती करण्यात आलेली नाही.