पिनकोडमध्ये कायम 6 आकडेच का असतात?

कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का?

Updated: Oct 6, 2021, 12:47 PM IST
पिनकोडमध्ये कायम 6 आकडेच का असतात?  title=
प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई : पिन कोड किंवा पोस्टल इन्डेक्स नंबर आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक आहे. होम डिलीव्हरी, ऑनलाईन शॉपिंगच्या या काळात दर दिवशी नव्या कार्यप्रणालीचा वापर वाढत असतानाच पिनकोडही या साऱ्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. पण, या पिनकोडबाबत तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहेत का?

पिनकोडमध्ये 6 च आकडे का असतात आणि त्या आकड्यांचा नेमका अर्थ काय, किंबहुना संपूर्ण पोस्ट खात्याची मदार या 6 आकड्यांवर कशी काय आधारलेली असते? केलाय का कधी याचा विचार?

गोष्ट पिन कोडची....

15 ऑगस्ट 1972 पासून सहा आकडी पिन कोड अस्तिस्वात आला. 9 भौगोलिक क्षेत्रांना युनिक पिन देण्यात आला, तर 9 आकडा आर्मी पोस्टल सर्विससाठी राखीव ठेवण्यात आला. भारतात सध्या 19101 पिन अस्तित्वात असून, 154725 पोस्ट ऑफिस या अंतर्गत येतात.

पिनकोडमधील असणाऱ्या आकड्यांमुळे अमुक एका ठिकाणाची माहिती आणि त्याचं मूळ स्थान कळून घेण्यास मोठी मदत होते. अगदी सहजपणे एखाद्या ठिकाणी पोहोचं याच सहा आकड्यांमुळे साध्य होतं. प्रांत, राज्य बदलतात तसतसा हा पिनकोडही बदलत असतो. पिनकोडच्या माध्यमातून देशाचा कानाकोपरा खऱ्या अर्थानं जोडला गेला आहे, असं म्हणायला हरकत नाही.