अंडे के फंडा! या कोंबड्यांना झालंय तरी काय? का देताहेत हिरव्या रंगाची अंडी

निर्सगाची करणी आणि...अशीच काहीसी प्रचिती हिरवं बलक असलेलं अंड पाहून येत आहे.

Updated: Aug 8, 2022, 07:41 PM IST
अंडे के फंडा! या कोंबड्यांना झालंय तरी काय? का देताहेत हिरव्या रंगाची अंडी title=

Green Egg Omlete: "संडे हो या मंडे... रोज खाओ अंड" हे वाक्य आपण प्रत्येकाच्या तोंडी ऐकलं असेलच. कारण अंड्याची जाहिरात मनावर खोल रुतली आहे की, अंड्याचं महत्त्व अधोरेखित होतं. निरोगी आणि उत्तम आरोग्यासाठी आहारात अंड असणं गरजेचं आहे. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब 12, ब5 आणि ब2 ही जीवनसत्त्व असतात. याबरोबर फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा 3 आणि इतर महत्त्वाची घटक असतात. त्यामुळे अंड्याचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो. पण सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच अंड्याची चर्चा सुरु झाली आहे. 

निर्सगाची करणी आणि...अशीच काहीसी प्रचिती हिरवं बलक असलेलं अंड पाहून येत आहे. सोशल मीडियावर सध्या हिरवं बलक असलेल्या अंड्याची चर्चा सुरु आहे. कारण आतापर्यंत आपण पिवळं बलक असलेलं अंड पाहिलं आहे. खरंच कोंबडी हिरवं बलक असलेलं अंड देऊ शकते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे तुम्हीही म्हणाल की ही बातमी फेक आहे. पण खरंच केरळमधील कोंबड्या हिरवा बलक असलेलं अंड देतात. हो तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. या बलकाचा रंग बदलला तरी चवीत कोणताही फरक नाही हे विशेष. 

अंड्यातील बलक हिरवं का होतं?

रिसर्चमध्ये दावा केला आहे की, या कोंबड्यांना खास पद्धतीने खाणं दिलं जातं. या कोंबड्यांना हिरव्या भाज्या आणि पानं खायला दिली जातात. त्यामुळे कोंबड्या हिरव्या रंगाचं बलक असलेलं अंड देतात. कुकुटपालन करणाऱ्या एका फर्म मालकाने सांगितलं की, "कोंबड्यांना पालक आणि केळीची हिरवी पानं खायला देतो"

अंड्याचा बलक केरोटेनॉइड्समुळे हिरवं होतं. हे एक प्रकारचं रंगद्रव्य आहे.  हे रंगद्रव्य हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात नुकसान होत नाही. कोंबडीमध्ये हे रंगद्रव्य हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने पोहोचतं. जेव्हा केरोटेनॉइड्स चरबीत जमा होते, तेव्हाच अंड्यातील पिवळा बलकाचा रंग बदलतो.