स्टंट करणं तरुणाच्या जिवावर बेतलं, गाडीचा एक कट आणि... पाहा व्हिडीओ

रत्यांवरुन वाहनांच्या मधून रस्ता काढत तरुण पुढे जात होता. परंतु तेव्हाच त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला.

Updated: Aug 8, 2022, 07:31 PM IST
स्टंट करणं तरुणाच्या जिवावर बेतलं, गाडीचा एक कट आणि... पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक अपघात घडत असतात. यांपैकी बरेच आपघात हे चालकाच्या चुकीमुळे घडतात, तर काही वेळा स्वत:ची चुकी नसतानाही अपघात घडतात. आपण या संदर्भात अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील पाहातो. हे व्हिडीओ आपल्या अंगावर काटा आणणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचा थरकाप उडेल.

तरुण मंडळी ही खूप साहसी असतात, त्यांचं रक्त सळसळतं असतं, म्हणून ते काहीही करण्याची तयारी दाखवतात. पण याचे काय परिणाम होतील, याचा ते जराही विचार करत नाहीत. 

असंच या व्हिडीओमधील तरुणासोबत घडलं, या तरुणाने स्वत:च्या स्टंटबाजीनं आणि मूर्खपणानं स्वत:चंच नुकसान करुन घेतलं. यामध्ये रत्यांवरुन वाहनांच्या मधून रस्ता काढत तरुण पुढे जात होता. परंतु तेव्हाच त्याच्यासोबत विचित्र प्रकार घडला.

हा व्हिडीओ दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ''तुमची इच्छा रस्त्यावर चालणार नाही, तुम्ही असे स्टंट केले, तर जोडण्यासाठी एकही शिंपी उपलब्ध होणार नाही.'' हे असं का लिहिलंय हे पाहण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हीही पाहा.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रस्त्यावर वेगाने दुचाकी चालवत आहे. अचानक त्या व्यक्तीचे संतुलन बिघडते आणि तो खाली पडतो. तो ज्यापद्धतीने खाली पडतो, तो क्षण अंगावर काटा आणणारा आहे.