अविश्वास ठराव: पाहा कोण मोदींच्या बाजूने आणि कोण मोदींच्या विरोधात

अविश्वास ठरावात कोण कोणाच्या बाजुने...

Updated: Jul 20, 2018, 09:43 AM IST
अविश्वास ठराव: पाहा कोण मोदींच्या बाजूने आणि कोण मोदींच्या विरोधात title=

नवी दिल्ली : विरोधी पक्ष आज मोदी सरकार विरुद्ध लोकसभेत अविश्वास ठराव मांडणार आहे. 2019 च्या निवडणुकीआधी हे मोदी सरकारचं शक्तीप्रदर्शन असेल. विरोधी पक्षाला देखील एकजुटता दाखवण्याची संधी मिळणार आहे. लोकसभेमध्ये होणाऱ्या या चाचणीत हे स्पष्ट होईल की कोण मोदी सरकारच्या बाजुने आहे आणि कोण त्यांच्या विरोधात. लोकसभेमध्ये एकूण खासदारांची संख्या 544 आहे. पण लोकसभेत 10 जागा खाली आहेत. त्यामुळे आता लोकसभेत एकूण संख्या 534 आहे. सरकारला 268 खासदारांच्या समर्थनाची गरज आहे.

कोण कोणाच्या बाजुने?

लोकसभेत एनडीएच्या सदस्यांची संख्या 313 आहे. यामुळे लोकसभा अध्यक्षांसह भाजपकडे 274, शिवसेनेचते 18, रामविलास पासवान यांचा पक्ष एलजेपीचे 6 आणि प्रकाश सिंह बादल यांच्या शिरोमणी अकाली दलचे 6 सदस्य आहेत. यासोबतच अंबुमणी रामदास यांच्या PMK आणि राजू शेट्टी यांचं देखील समर्थन मिळण्याची शक्यता आहे. 314 खासदारांच्या यादीत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं मत नसणार आहे. सुमित्रा महाजन या इंदौरमधून भाजपच्या खासदार आहेत.

विरोधकांमध्ये 2 गट

विरोधी पक्षाकडे 222 जागा असल्याचं बोललं जातंय. ज्यामध्ये काँग्रेसचे 48, एआयएडीएमकेचे 37, टीएमसीचे 34, बीजेडीचे 20, टीडीपीचे 16 आणि टीआरएसचे 11 सदस्य आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वात असलेल्या आघाडीमध्ये 2 गट पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये टीएमसी, सीपीएम, राष्ट्रवादी, सपा, आरजेडी आणि आपचा समावेश आहे. दुसऱ्या गटाची एकूण संख्या जवळपास 150 आहे. एआयएडीएमके, बीजेडी आणि टीआरएस विश्वासदर्शक ठरावात तटस्थ राहू शकतात. यांचा एकूण आकडा 70 आहे.