A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे. नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत. भाव्या लाल (Bhavya Lal) यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ए.सी.चारनिया यांची बुद्धी अफाट आहे. त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात खूप मोठे काम केले आहे. नासाच्या कामासाठीही त्यांचा अनुभव आणि शिक्षण कामी येईल याची मला खात्री आहे अशी भावना भावना लाल यांनी व्यक्त केली आहे परंतु ए.सी.नाराणिया नक्की आहेत तरी कोण? याबद्दल जाणून घेऊया. (Who is indian american nasa chief technologist a.c.charania aerospace industry)
नासाच्या तंत्रज्ञान आणि त्यासंबंधी धोरणावर चाराणिया काम पाहणार आहेत. त्यांचे नासाच्या मिशनमध्ये (Nasa Mission) त्यांचा सहभाग राहील. नासाच्या 6 मिशन्सचे काम ते पाहणार आहेत. तंत्रज्ञानाच्या कामांबरोबर ते खाजगी क्षेत्र, फेडरल एजन्सीज आणि बाहेरच्या शेअरहॉल्डर्सचेही काम पाहणार आहेत. चारणिया या नियुक्तीबद्दल म्हणाले की, 21 व्या शतकात आपण ज्या प्रमाणे प्रगती करणार आहोत, त्याप्रमाणे आपल्या तंत्रज्ञानाला आपण कसं विकसित करतो ते पाहणं महत्त्वाचं आहे. नासामध्ये आणि बाहेर सगळीकडेच खूप चांगल्या संधी आहेत. त्यामुळे या नियुक्तीकडे मी खूप सकारात्मकेतेने पाहतो आणि यापुढे अंतराळ आणि वैमानिक क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक आहे.
ए.सी. नाराणिया यांनी जॉर्जिया इन्सिस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Georgia Institute of Technology) येथून एरोस्पेस एन्जिनियरिंगमध्ये पदवी संपादन केली आहे तसेच त्यांनी पद्यूत्तर शिक्षणही पुर्ण केले आहे. त्यांनी एमोरी विद्यापीठातून अर्थशास्त्राचीही पदवी संपादन केली आहे. नासात जॉईन होण्याआधी चारणिया यांनी रिलॅबल रोबोटिक्स (Reliable Robotics) येथे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. एका कंपनीत ब्लू मून लॅन्डर लोनार प्रोग्रॅममध्येही (Blue Moon lunar lander program) त्यांनी काम पाहिले आहे तसेच त्याआधी त्यांनी एका कंपनीत सॅटेलाईट लॉन्च व्हेयेकल प्रोग्रॅमचंही (satellite launch vehicle programme) काम पाहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षात भारतीय वर्षांचे नागरिक देशातच काय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावं कमावत आहेत आणि मोठ्या पदावरही जात आहेत. त्यात सुंदर पंचाई, गीता गोपिनाथ, पराग अग्रवाल, इंदिरा नूयी, ऋषी सुनक अशा व्यक्तीची नावं आहेत. त्यामुळे सध्या ही बाब भारतीयांसाठी खूपच गर्वाची आहे. सध्या अंतराळ आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होते आहेत आणि यात भारतीयांचाही वाटा मोठा आहे.