... म्हणून या पांढऱ्या मोराचा व्हिडिओ होतोय व्हायरल

नाचणाऱ्या मोराचा व्हिडिओ व्हायरल

Updated: Jun 10, 2020, 05:02 PM IST
... म्हणून या पांढऱ्या मोराचा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : लॉकडाऊनमुळे रस्ते ओस पडले होते. या दरम्यान अनेक ठिकाणी मोरांचा वावर पाहायला मिळाला. पावसाचे दिवस जवळ आले आहेत. त्यामुळे याआधी मोरांना नाचताना अनेकदा पाहिलं गेलं असेल. सध्या अशाच एका मोराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मोराला पिसारा फुलवताना पाहण्यासाठी अनेक जण आतुर असतात. पण सगळ्याना तो लाईव्ह पाहण्याचा योग मिळत नाही. 

सध्या एका पांढऱ्या शुभ्र मोराचा डान्स व्हायरल होत आहे. वन अधिकारी असलेले प्रवीण कस्वान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की'' हा पांढरा मोर त्याच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी नाचत आहे.' विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यानातील हा व्हिडीओ असल्याचं कळतं आहे.

पांढरा मोर पाहण्याचा योग तसा अनेकांना कमीच आला असेल.