ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा?

Gyanvapi Vyasji Basement Idol: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आता कोर्टाने या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकारही दिला आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 2, 2024, 06:06 PM IST
ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची होतेय पूजा? title=
Which Gods Are Being Worshiped In Gyanvapi Vyasji Basement

Gyanvapi Vyasji Basement Idol: उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या (gyanvapi masjid case) तळघरात सापडलेल्या देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा करण्याचा अधिकार जिल्हा न्यायालयाने दिला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरातील पूजेचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले आहेत. अशातच ज्ञानवापीच्या तळघरात कोणत्या देवी-देवतांची पूजा होतेय? असा सवाल नागरिकांना पडला आहे. 

ज्ञानवापीच्या एएसआय सर्वेक्षणाच्या दरम्यान व्यासजी तळघरात देवतांच्या मूर्ती सापडल्या होत्या. 31 जानेवारी रोजी जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हिंदू पक्षकारांना मूर्तींची नियमित पूजा करण्याचा अधिकार दिला होता. जिल्हा प्रशासनाला सात दिवसांच्या आत पूजेची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या आदेशानुसार, एक फेब्रुवारी 3.30 वाजता पहाटे पहिली आरती करण्यात आली. 

तळघरात कोणत्या देवतांच्या मूर्ती?

पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणात तळघरात सापडलेल्या मूर्ती पुन्हा त्याच जागेवर ठेवून पुजा सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली होती. सर्वेक्षणााच्या दरम्यान ज्ञानवापी परिसरात 55 मूर्ती सापडल्या होत्या. यातील 9 मूर्ती आणि राम नाम असलेले शिलालेख व्यास तळघरातून सापडले होते. तळघरात सापडलेल्या मूर्तींमध्ये दोन हनुमान, दोन भगवान विष्णु आणि एक भगवान गणेशा यांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त शिवलिंग, अरघा आणि गंगेचे वाहन मगर यांचीही आकृती तळघरात ठेवण्यात आली होती. 

वारणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशांतर्गंत जिल्हा प्रशासन व मंदिर प्रशासनाने गुरुवारी 3.30 वाजता पूजा संपन्न करण्यात आली. त्यापूर्वी ज्ञानवापी परिसरात लोखंडाचा गेट देखील तयार करुन ठेवण्यात आला. दक्षिणेकडील तळघरात उत्तर भिंतीवर मूर्ती ठेवण्यात आल्या आहेत. 

तळघरात मानस पाठ सुरू 

ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा-अर्चना झाल्यानंतर काशी विद्वत परिषदेकडून तळघरात श्रीरामचरित मानस पाठ सुरू करण्यात आला होता. परिषदेचे महामंत्री प्रो. रामनरायण द्विवेदी यांनी म्हटलं होतं की, मानसपाठ अविरत सुरू राहणार आहे. यासाठी मंदिर प्रशासनाने सहा पुजाऱ्यांना तैनात केले आहे. 

अथर्ववेद मंत्रोच्चाराने उघडला दरवाजा

ज्ञानवापीच्या तळघरात असलेल्या देवी-देवतांची पूजा 31 वर्षांनंतर करण्यात आली. अनेक वर्षांपासून बंद असलेल्या तळघराचे दार उघडण्यासाठी वैदिक पद्धतीने अथर्ववेदाच्या विशिष्ट मंत्रांचे उच्चारण करण्यात आले. हे मंत्र एखाद्या देवालयाचे दार कित्येक वर्षांपासून बंद असेल तरच पठण केले जातात.