जेव्हा घोड्यावर चढताना नवरदेवाची पॅन्ट फाटते... पुढे जे घडलं ते मनोरंजक, पाहा व्हिडीओ

लग्नाचा दिवस हा नवरा-नवरी दोघांसाठी फार महत्वाचा असतो, त्या दिवशी सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे त्यांना वाटत असते.

Updated: Dec 25, 2021, 05:00 PM IST
जेव्हा घोड्यावर चढताना नवरदेवाची पॅन्ट फाटते... पुढे जे घडलं ते मनोरंजक, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सध्या सर्वत्र लग्न सोहळा सुरू आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती आपल्या दररोज त्याच्याशी संबंधीत काही व्हिडीओ किंवा फोटो पाहायला मिळतात. काही व्हिडीओ इतके मनोरंजक असतात की आपण ते वारंवार पाहतो. तर आपल्या मित्रांना देखील आपण ते शेअर करतो. तर काही व्हिडीओ एखाद्या अशा क्षणाचे असताता. जे पाहूण आपल्याला हसावे की दु:ख व्यक्त करावे हे कळत नाही.

लग्नाचा दिवस हा नवरा-नवरी दोघांसाठी फार महत्वाचा असतो, त्यामुळे त्या दिवशी सर्व आपल्या मनाप्रमाणे व्हावे असे त्यांना वाटत असते. परंतु त्यांच्या या विशेष दिवशी त्यांच्या सोबत काही चुकीचं घडलं तर? त्यांच्यासाठी ही फार लाजिरवाणी गोष्ट ठरले.

परंतु काही लोकं या गोष्टीला मजेदारपणे घेतात तर, काही लोकांना आपला दिवस खराब झाल्याने राग अनावर होतो.

सध्या सोशल मीडियावरती एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आपला दिवस खराब झाल्यामुळे नवरदेव खुप चिढला आहे.

खरेतर नवरदेव जेव्हा वरातीमध्ये घोड्यावरती बसायला जातो, तेव्हा त्याची पॅन्ट फाटते आणि त्याचं हसू होतं. उपस्थीत सगळे लोक या कृत्याला पाहून जोरजोरत हसू लागतात. जे पाहून नवरदेवाला आपला राग आवरत नाही आणि तो जोरजोरात ओरडू लागतो, ज्यानंतर तेथील वातावरण बदलतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठचा आणि कुठला आहे हे काही समोर आलेलं नाही.

एका वापरकर्त्याने व्हिडीओवर कमेंट करत लिहिले: त्यामुळे पारंपरिक धोती घाला. आणखी एका यूजरने लिहिले की, 'त्याने असा ड्रेस का घातला आहे.'