पटना : सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू प्रसाद यांचे पूत्र तेजस्वी यादव यांनीही ट्विट करून प्रतिक्रीया दिली आहे.
तेजस्वी यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, लालू ज्या समाजात आणि गरीबीत जन्माला आले ज्या संघर्षाच्या जीवावर त्यांनी सत्तेला हादरा दिला. समाजाला न्याय मिळवून दिला. तो संघर्षच एक घोटाळा आहे. म्हणूनच लालूंना दोषी ठरविण्यात आले. तेजस्वी यादव यांनी पुढे म्हटले आहे की, सत्याला कोणीच पराभूत करू शकत नाही. आमचा विजय होईल. नक्की होईल. फक्त आपला विश्वास आणि प्रेम कायम ठेवा.
दरम्यान, तेजस्वी यादव यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आव्हान केले असून, न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करण्याचे अवाहन केले आहे. मात्र, तेजस्वी यादव यांनी आणखी एक ट्विट केले आहे. हे ट्विट लक्षवेधी असून, त्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. तेजस्वी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'हे सत्ते तुला मास्ती, तर आमचीही तयारी आहे. प्रत्येक बिहारी लालूंच्या सोबत उभा आहे.'
सत्ता तेरा ज़ुल्म बहुत, तो हमारी भी तैयारी है।
लालू जी के साथ खड़ा एक-एक बिहारी है।#LaluBiharKaLal pic.twitter.com/5tGo8WatHm— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) December 23, 2017
लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना 1990 ते 1994 दरम्यान चारा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकणात देवघर कोषागारमधून पशुंच्या चाऱ्यासाठी अवैधपणे 89 लाख, 27 हजार रुपये काढल्याचा आरोप होता. संपूर्ण घोटाळ्याचा विचार करता हा आकडा 950 कोटींवर पोहोचतो. या प्रकरणात 38 जण आरोपी होते. या आरोपींविरोधात विरोधात सीबीआयने 27 ऑक्टोबर, 1997 ला तक्रार दाखल केली. तब्बल 20 वर्षानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला.