Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'

Anand mahindra On lucky number : आनंद महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

Updated: Oct 6, 2023, 08:54 PM IST
Anand mahindra यांच्या 55 नंबर जर्सीचं रहस्य काय? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणतात 'माझी जुनी सवय...'  title=
Anand Mahindra's number 55 jersey

Anand mahindra News : सोशल मीडियावरील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand mahindra) अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. अनेक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी नेटकऱ्यांना योग्य सल्ले दिले आहेत. तर अनेकांचं मनोरंजन देखील केलंय. अशातच सध्या सुरू असलेल्या आयसीसी वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) आनंद महिंद्रा देखील तयार झालेत. आयसीसी क्रिकेट विश्वचषक’ सुरु होण्याआधी टीम इंडियाच्या जर्सीचा एक फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी चर्चा रंगली ती आनंद महिंद्रांच्या जर्सी नंबरची... महिंद्रा यांनी 55 नंबरची जर्सी शेअर केली. मात्र, त्यांनी 55 नंबरच का निवडला? यावर आता त्यांनी खुलासा केला आहे.

आनंद महिंद्रा आणि ५५ नंबरचे नेमके काय कनेक्शन काय? हे शोधून काढण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. त्यावर अनेकांनी एक्स पोस्ट करत महिंद्रांकडून खरं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यातील एका पोस्टला रिपोस्ट करत त्यांनी खरं उत्तर दिलं आहे. नेमकं काय म्हणाले आनंद महिंद्रा? 55 नंबर अन् महिंद्रांचं नातं काय? याचं उत्तर काय दिलं पाहुया...

काय म्हणाले Anand mahindra ?

माझी जन्मतारीख 1-5-55 आहे आणि 5 हा नेहमीच लकी क्रमांक ( lucky number) आहे. आणि काही विचित्र योगायोगाने, जेव्हा मी 1991 मध्ये M&M मध्ये सामील झालो तेव्हा ट्रॅक्टर विभागातील लोकांनी मला सांगितले की 5 हा कंपनीचा भाग्यवान क्रमांक देखील होता. त्यामुळे आमच्या सुरुवातीच्या अनेक ट्रॅक्टरचे क्रमांक B-275 सारखे होते. ती सवय आजही कायम आहे. 

पाहा पोस्ट

दरम्यान, टेक महिंद्रा कंपनी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये बीसीसीआयची  (BCCI) डिजीटल पार्टनर असणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने आनंद महिंद्रा यांना त्यांच्या नावाची आणि लकी नंबर 55 ची जर्सी सुपूर्त केली. त्यावेळी त्यांनी.. मी तयार आहे, असं लिहिलं होतं. त्यावेळी त्यांनी जर्सीबद्दल बीसीसीआयचे देखील आभार मानले होते.