मुंबई : एक वेळ अशी होती जेव्हा पांढरे केस असणे हे म्हातारपणाचे लक्षण मानले जायचे. पण आता वयाच्या वीशीतही केस पांढरे होऊ लागतात. भारतामध्ये वेळेआधीच केस पांढरे होण्याची समस्या वाढत चालली आहे. मेनेनिन नावाच्या रंगद्रव्यामुळे केसांना त्यांचा रंग मिळतो. केसांमध्ये मेलेनिनचा स्तर जितका जास्त तितकाच केसांचा रंग दाट असतो. वाढत्या वयानुसार मेलेनिन कमी किंवा वाढते पण हे वेळेआधीच होते. अनेक प्रकरणांमध्ये केस पांढरे होणे यामागे अनुवांशिक कारण असते. यासाठी अनेकजण आपले आई-वडील आणि पूर्वजांना दोष लावतात. जर अनुवांशिक कारणामुळे केस पांढरे होत असतील तर जास्त काही केलं जाऊ शकत नाही. तुम्ही काहीही उपाय करा ते पुन्हा पांढरे होतातच.
शरीरामध्ये झिंक, कॉपर, विटामिन बी'च्या कमीमुळे केस वेळेआधी सफेद होतात. संतुलीत आहार घेऊन हे रोखल जाऊ शकतं. तुमच्या आहारा प्रोटीनचे प्रमाण जास्त असणे गरजेचे आहे. कारण केस हे मुळत: प्रोटीनने बनत असतात.
ताण-तणाव हे केस वेळेआधी पाढंरे होण्याचे मोठे कारण आहे. तुम्ही जेव्हा तणावात असता तेव्हा त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होत असतो. तणावमुक्त राहण्यासाठी योगाची मदत घेऊ शकता. कामाच्या मध्ये लहान लहान ब्रेक घ्या. श्वासाशी संबंधित व्यायाम करा आणि डोके मॉलिश करा.
धुम्रपानाची सवय केस सफेद होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. जर तुम्ही अजूनपर्यंत ही सवय सोडली नसेल तर आता तुम्हाला सोडावीच लागेल.
जास्त प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थांच्या सेवनाने तुमचे स्वास्थ्य आणि केस देखील चांगले राहीतील. शरीरात पाण्याची कमी झाल्यास पोषक तत्व तुमच्या केसांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचत नाहीत. अशावेळी तुम्हाला केस गळणे आणि वेळेआधी पांढरे होण्याच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.
नियमित व्यायाम करण्याने तुमचे रक्ताभिसरण योग्य होते आणि केस नैसर्गिकरित्या सुंदर राहतील.
आठवड्यातून एकदा तुमच्या केसांची म़ॉलिश चांगल्या तेलाने करा. भृंगा, बदामचे तेल केसांसाठी चांगले असते.
हलका आणि पोषक तत्वांनी भरलेल्या शॅंम्पूचा वापर करा. नैसर्गिक आणि हर्बल शाम्पू सर्वात योग्य ठरु शकतो.
विटामिन सी हे केसांचे पांढरे होणे थांबवण्यासाठी परिणामकारक आहे. आपल्या आहारात संत्रे आणि टरबूज, कलिंगडसारख्या फळांचा उपयोग करा.
मासे केसांसाठी योग्य आहार ठरतो. त्यांच्यामध्ये सेलेनियम आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. हे दोन्ही गुण केसांसाठी लाभदायक असतात.