पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी ममता सरकारवर साधला निशाणा, टिट्व करत केला हा आरोप

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Updated: May 27, 2020, 02:30 PM IST
पश्चिम बंगालचे राज्यपाल यांनी ममता सरकारवर साधला निशाणा, टिट्व करत केला हा आरोप title=

कोलकाता : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) यांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील स्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि सामान्य लोकांना दिलासा द्यावा, असे आवाहन राज्यपाल धनखर यांनी केले आहे.  

जगदीप धनखर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री ममता यांच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 'वीज, पाणी आणि अन्य आवश्यक सेवा त्वरित सामान्यांसाठी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. तळागाळातील लोकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. 

 'राजकारणा करण्याऐवजी योग्य वेळी तयारीकडे लक्ष दिले गेले असते तर इतकी भीतीदायक  परिस्थिती उद्धभवलेली नसती. वरिष्ठ मंत्र्यांचा अनुभव  कामाला येत नाही. त्यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरु आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आमदाराला मारहाण हे कशाचे धोतक आहे, याचे वास्तव दर्शन दिसून येत आहे, असे जोरदार हल्लाबोल राज्यपाल जगदीप धनखर यांनी केला आहे. 

राज्यापाल धनखर यांनी ग्रामीण भागाच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाकडे लक्ष द्यावे किंवा देण्याची अधिक गरज आहे.. ग्रामीण भागातही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी लक्ष देण्याची गरज आहे. या भागांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. घटनेनुसार मी ममता बॅनर्जी यांना परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी उद्युक्त करतो, असे राज्यपाल यांनी म्हटले आहे.

धनखर यांनी अलीकडेच चक्रीवादळ अम्फानबाबत ममता बॅनर्जी सरकारच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की जेव्हा हवामान खात्याने चक्रीवादळाबद्दल 15 दिवस अगोदर माहिती दिली होती, तेव्हा बंगाल सरकारने त्यास सामोरे जाण्यासाठी पूर्ण तयारी का केली नाही. ते म्हणाले होते की जर 3 दिवसांपूर्वी सैन्य बोलावले गेले असते तर परिस्थिती सामान्य झाली असती.

राज्यपाल धनखर या चक्रीवादळ आणि आलेल्या अम्फान वादळाच्या पार्श्वभूमीवर बॅनर्जी यांच्या सरकारने काहीही केलेले नाही. त्यांच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यावेळी हवामान विभागाने १५ दिवस आधीच इशारा दिला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. दरम्यान, लष्कराला तीन महिने येथे पाचारण करण्यात आले असते तर येथील परिस्थिती सामान्य राहिली असेत, असे त्यांनी म्हटले आहे.