Wedding News: पाहणारे असे काही म्हणाले की, साजशृंगार केलेल्या नववधूचा संताप झाला अनावर

सहसा विवाहसोहळे म्हटलं की नववधूवरच साऱ्य़ांच्या नजरा खिळलेल्या असतात. 

Updated: Oct 16, 2021, 09:14 AM IST
Wedding News: पाहणारे असे काही म्हणाले की, साजशृंगार केलेल्या नववधूचा संताप झाला अनावर  title=

मुंबई : सहसा विवाहसोहळे म्हटलं की नववधूवरच साऱ्य़ांच्या नजरा खिळलेल्या असतात. ती लग्नासाठी कोणता लूक करते, कोणत्या पेहरावाला पसंती देते या साऱ्याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली असते. अगदी नवरदेवापासून सोहळ्यासाठी आलेल्या प्रत्येकालाच नवरीबाबत कुतूहल असतं. पुढे.... नवरी समोर येते आणि तिचं रुप पाहून प्रत्येकजण तिची प्रशंसा करु लागतं. पण, एका विवाहसोहळ्यात जरा वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. 

 सहसा नवरीची प्रशंसा केल्यावर तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते, ती काहीशी लाजतेसुद्धा. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधील नववधू तिची प्रशंसा केल्यानंतर फारच विचित्र प्रकारे व्यक्त होताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by I DONT SAY CHEESE (@idontsaycheese)

लग्नाच्या दिवशी नवरी तयार वगैरे झाल्यानंतर कोणीतरी तिला, 'तू पारोसारखी दिसत आहेस' अशी कॉम्प्लिमेंट करतं. पण, तिला या कमेंटचा नेमका अर्थ कळत नाही. ज्यामुळे ती अतिशय विचित्र प्रतिक्रिया देते. तुम्ही कॉम्प्लिमेंट चांगल्या अर्थाने देत आहात की वाईट अर्थाने असं विचारत ती नवरीबाई समोरच्यांना काहीसं रागे भरत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसते.