Weather Update: 'या' भागात सोसाट्याचा वारा सुटणार, पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा Alert

Weather Update: देशातील काही भागांमध्ये आता थंडी काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर, उत्तरेकडे असणाऱ्या जम्मू काश्मीरमध्ये मात्र हिमवृष्टी सुरुच आहे. 

Updated: Feb 10, 2023, 07:47 AM IST
Weather Update: 'या' भागात सोसाट्याचा वारा सुटणार, पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा Alert  title=
Weather Update Rain alert snowfall in many states latest Marathi news

Weather Update: (Climate Change) हवामानाच्या बदलत्या रंगांचा परिणाम आता शेतमालापासून नागरिकांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. सध्याच्या घडीला देशातील काही भागाला कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळाला आहे. पण, काही भागांमध्ये मात्र परिस्थिती तसुभरही सुधारलेली नाही. उत्तर भारतामध्ये सक्रीय झालेल्या पश्चिमी विक्षोभामुळं सध्या मैदानी भागांमध्ये हवामान सातत्यानं बदलताना दिसत आहे. याच धर्तीवर उत्तराखंडमध्ये (Uttaakhand) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता (Rain Alert) वर्तवण्यात आली आहे. 

उत्तराखंडमध्ये पावसासोबतच काही भागांमध्ये हिमवृष्टीचा तडाखाही बसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (Jammu Kashmir) जम्मू काश्मीर, लडाख (Ladakh), गिलगिट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद आणि (Himachal pradesh) हिमाचल प्रदेशमध्ये येत्या काही दिवसांमध्ये प्रचंड हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काश्मीरच्या खोऱ्यामध्ये हिमवृष्टीमुळं जनजीवन विस्कळीत होईल असंही सांगण्यात आलं आहे. 

पश्चिमी झंझावाताचे थेट परिणाम.... 

हवामान विभागाच्या माहितीनुसार इराणवाटे भारतात येणारा पश्चिमी झंझावात सध्याच्या घडीला उत्तर भारतातून पुढे जात आहे. ज्यामुळं किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. परिणामी समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या भागांमध्ये 120 मैल समुद्री जेट स्ट्रीम वारे वाहू शकतात. ज्यामुळं किनारी भागात ढगाळ वातावरणासोबतच दूर पंजाबमध्येही हलक्या स्वरुपात पावसाच्या सरींची हजेरी असेल. महाराष्ट्रातही सकाळच्या वेळी तापमानात काहीशी वाढ नोंदवण्यात येईल. तर, किनारपट्टी भागांवर ढगांची चादर असेल. 

कुठे बसणार पावसाचा तडाखा? 

स्कायमेटच्या अंदाजानुसार आसाम आणि सिक्कीम या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसू शकतात. तर, राजस्थानमध्ये धुळीचे वारे वाहू शकतात. अरुणाचल प्रदेशातील पर्वतीय भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पुढील तीन दिवसांमध्ये उच्चर पश्चिम आणि मध्य भारतात किमान आणि कमाल तापमानात वाढ होणार आहे. ज्यानंतर तापमानात 2-3 अंशांची घट नोंदवण्यात येईल. 

हेसुद्धा वाचा : Narendra Modi on Gandhi: "नेहरुंचे वंशज आहात ना, मग लाज वाटते का?," Rajya Sabha मध्ये मोदी गांधी कुटुंबावर संतापले

 

देशभरात हवामानात बदल होत असतानाच काश्मीरमध्ये अनेक भाग बर्फाच्छादित असतील. ज्यामुळं पर्यटकांसाठी ही परवणी असेल. काही भागांमध्ये तीव्र हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळं तिथं मात्र नागरिक आणि पर्यटकांनी ये-जा टाळावी असाही इशारा देण्यात आला आहे.