Smriti Irani Daughter Wedding: स्मृती इराणी यांची मुलगी अडकली विवाह बंधनात, फोटो आले समोर

Shanelle Irani Wedding: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जुबिन इराणी यांची मुलगी शनेल इराणी हिचा आज विवाह सोहळा पार पडला, राजस्थानमध्ये शाहि सोहळा संपन्न झाला

Updated: Feb 9, 2023, 09:57 PM IST
Smriti Irani Daughter Wedding: स्मृती इराणी यांची मुलगी अडकली विवाह बंधनात, फोटो आले समोर title=

Shanelle Irani Wedding First Picture: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) आणि जुबिन इराणी (Zubin Irani) यांची मुलगी शनेल इराणी (Shanelle Irani) आज लग्नबंधनात अडकली. राजस्थानमधल्या (Rajasthan) खिंवसर किल्ल्यावर (Khimsar Fort) शाही सोहळा पार पडला. शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला (Shanelle Irani and Arjun Bhalla Wedding) यांचा लग्नानंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. राजस्थानमधल्या 500 वर्ष पुरातन आणि ऐतिहासिक खिंवसर किल्ल्यावर हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. तीन दिवस लग्नाचे कार्यक्रम पार पडले, यासाठी खिंवसर किल्ला आकर्षक फुलांनी आणि रोषणाईने सजवण्यात आला होता.

शानेल इराणीच्या लग्नाचे फोटो आता समोर येऊ लागले आहेत. हे हाय प्रोफाईल लग्न असल्याने काही मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. इराणी आणि भल्ला कुटुंबातील फक्त जवळचे लोक या सोहळ्याला उपस्थित होते.

थीम 'राजस्थानची संस्कृती'
शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या लग्नासाठीचं वेडिंग डेस्टिनेशन (Wedding Destination) हे राजा महाराजांच्या इतिहासाशी निगडीत आहे. खिंवसर हा ऐतिहासिक किल्ला होता, आता त्याचं अलिशान हॉटेलमध्ये रूपांतर झालं आहे. राज घराण्याद्वारे या किल्ल्याची देखरेख ठेवली जाते. लग्नात राजस्थानी पेहराव, राजस्थानी संस्कृती आणि राजस्थानची लज्जत अशी थीम ठेवण्यात आली होती.

आपल्या मुलीच्या लग्नात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी खूपच खूश होत्या. शनेलच्या लग्नात त्यांनी डान्सही केला. या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. वधू-वर एकमेकांना हार घालतात ते खिंवसार किल्ल्यातील एक विशिष्ठ ठिकाण आहे. त्याला रोहिनच क्षेत्र म्हणतात. या ठिकाणी फुलांनी सजवलेल्या मंडपात वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहार घातला. 

3 दिवसांसाठी बूक केला होता किल्ला
खिंवसर किल्ल्यावर 7-8-9 फेब्रुवारी असे तब्बल तीन दिवस केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीचा लग्नाचे विविध कार्यक्रम पार पडले. गुरुवारी शनेल आणि अर्जुन यांचा विवाह संपन्न झाला. शनेल आणि अर्जुनच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठीही महत्त्वाची आणि खास जागा निवडण्यात आली आहे.