वोडाफोन ५० लाख तरुणांना नोकरीसाठी तयार करणार

 वोडाफोनतर्फे २०२२ पर्यंत भारतात ५० लाख आणि १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या जगातील नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार केले जाणार आहे.

Updated: Mar 22, 2018, 10:37 AM IST
वोडाफोन ५० लाख तरुणांना नोकरीसाठी तयार करणार  title=

नवी दिल्ली : वोडाफोनने बुधवारी जगातील सर्वात मोठ्या 'आंतरराष्ट्रीय भविष्य नोकरी कार्यक्रमा'ची घोषणा केली. या कार्यक्रमात वोडाफोनतर्फे २०२२ पर्यंत भारतात ५० लाख आणि १८ देशातील १ कोटी तरुणांना नव्या जगातील नव्या नोकऱ्या करण्यासाठी तयार केले जाणार आहे. वोडाफोनने एक नवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म भविष्य नोकरी शोधण्यासाठी सुरू केला आहे. यामुळे तरुणांना वर्तमान डिजिटल अर्थव्यवस्थेतेत करिअर करण्यास योग्य मार्गदर्शन मिळणार आहे. नोकरी शोधण्यासही यामुळे मदत होणार आहे.

आवडीच्या क्षेत्रात ओळख 

 फ्यूचर जॉब फाइंडर अंतर्गत, जलद साइकोमीट्रिक टेस्टची एक श्रृंखला सुरु करण्यात आली आहे. यामाध्यमातून युवक त्यांच्या पात्रतेनुसर आवडीच्या क्षेत्रात ओळख बनवू शकणार आहेत. युजर्स या प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित ऑनलाइन डिजिटल कौशल्य प्रशिक्षण शोधू शकतात.

कौशल्यांना बढती 

भारत "देशातील सर्वात तरुणांची लोकसंख्या असलेला देश आहे. आम्ही सर्व सरकारच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनासाठी वचनबद्ध आहोत, ज्यासाठी डिजिटल कौशल्यांना बढती पाहिजे. वेळोवेळी, प्रत्येक कामाची जागा डिजिटल होत आहे आणि डिजिटल तंत्रज्ञानाची मागणी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या संदर्भात वाढत असल्याचे यावेळी  व्होडाफोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सूद यांनी सांगितले.