Wedding Video : विधी दरम्यान अचानाक उठली आणि मंडपातून सरळ चालत सूटली नववधू... मग अशी आली परत

एक लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Sep 4, 2021, 07:56 PM IST
Wedding Video : विधी दरम्यान अचानाक उठली आणि मंडपातून सरळ चालत सूटली नववधू... मग अशी आली परत title=

मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही ना काही विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या लग्नाचा सिझन असल्याने आपल्याला सोशल मीडिया उघडल्यावर एक तरी लग्नाचा व्हिडीओ पाहायला मिळतात. त्यात काही व्हिडीओ विधीदरम्यानचे असतात. तर काही व्हिडीओ मजेदार असतात. तुम्हाला तर माहितच आहे की, लग्नात काही ना काही विचित्र गोष्टी घडतच असतात, ज्यामुळे आपल्याला आपले हसू आवरत नाही.

असाच एक लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला आश्चर्च वाटेल. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वधू रागाने लग्न मंडप सोडून निघून जात आहे.

लग्नापूर्वी नवरदेवाशी भांडण

वधू -वरांच्या या सोशल मीडियावरील मजेदार व्हिडीओमध्ये वधू -वर लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी मंडपात बसले आहेत. तेवढ्यात कोणत्यातरी कारणामुळे दोघांमध्ये भांडण होतं. ज्यामुळे रागाने ही वधू लग्न मंडप सोडून निघून जाते. ती इतक्या रागाने मंडपातून निघून जाते हे पाहून सगळ्यांनाच वाटते की, ही काही आता परत येणार नाही. परंतु तशीच लगेच ही वधू मागे फिरते आणि हसत हसत पुन्हा मंडपात जाऊन उभी रहाते.

ही वधू मंडपातून निघाली तर रागाने होती, परंतु मग ती पुन्हा हसत मंडपात कशी आली हे तर त्या वधूलाच माहित. कदाचित ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला फसवत असावी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की, वधू रागाने जाऊन देखील कोणीही तिला समजवायला किंवा थांबवायला गेलं नाही. वधू रागाने मंडपा खाली उतरते आणि काही पावले चालते आणि मग अचानक ती स्वतःहून परत येते. वधूला मंडपाकडे जाताना पाहून तिचे नातेवाईक आणि मित्र परिवार सगळेच तिच्या या नौटंकीवर हसायला लागतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या लग्नाच्या व्हिडीओमध्ये, एक मुलगा मंडप पासून काही अंतरावर उभा आहे, तो नववधूची ही नाटकं पाहून आपले डोकं धरुन हसू लागतो. या व्हिडिओवर, लोकांनी मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांना ही वधू अशी का वागली हेच कारण समजले नाही. तर काही लोकांना या वधूची नाटकं आणि तिची नौटंकी फारच आवडली आहे. ज्यामुळे लोक या व्हिडीओला जोरदार शेअर करत आहेत.