पोलिसांपासून वाचण्यासाठी या महिलेनं जे केलं त्याला तोड नाही, पाहा व्हायरल व्हिडीओ

आपण सोशल मीडियाचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, तसेच काहीना काही व्हिडीओ, फोटो बघण्यासाठी करतो.

Updated: Oct 19, 2021, 05:58 PM IST
पोलिसांपासून वाचण्यासाठी या महिलेनं जे केलं त्याला तोड नाही, पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावरती आपल्यापैकी प्रत्येकजण सक्रीय आहे. आपण सोशल मीडियाचा वापर आपल्या मित्रांशी गप्पा मारण्यासाठी, तसेच काहीना काही व्हिडीओ, फोटो बघण्यासाठी करतो. सोशल मीडियावरती आपल्या अशा मनोरंजक गोष्टी पाहायला मिळताता, ज्यामुळे ते पाहाण्यात आपला वेळ कसा निघून जातो हे देखील आपल्याल कळत नाही. आपल्याला येथे आपल्या आवडीप्रमाणे म्हणजेच फनी, जेवणाचे, फिरण्याचे, सायन्स आणि टेक्नोलॉजी असे अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात.

सोशल मीडियावरील हे व्हिडीओ आपले मनोरंजन करण्याव्यतिरिक्त आपल्याला काही माहिती देखील देतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जे पाहून आपल्याला हसू तर येईलच, परंतु लोकांच्या युक्तीचे आपल्याला कौतुक देखील करावेसे वाटेल.

सोशल मीडियावरती आपण लोकांचे अनेक जुगाड पाहिले आहे परंतु या महिलेच्या जुगाडाला काही तोडच नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील हे मान्य करावेसे वाटेल. कारण या महिलेनं जे केलं, याचा विचार पोलिस देखील करु शकले नाही.

खरेतर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिस काही लोकांच्या मागे लागले आहेत. ज्यानंतर काही लोकं तेथून पळून लांब जाण्याचा प्रयत्न करताता, तर काही लोकं आपल्याला लपण्यासाठी जागा शोधत असतात. परंतु त्यांच्यामधील एक महिली तेथे एका घराबाहेर असलेली भांडी घेऊन बसते.

तिच्या असे केल्याने पोलिसांना असे वाटते की, ती महिला त्या घरातीलच असावी, ज्यामुळे पोलिसांनी तिला तेथे पाहून सुद्धा पकडले नाही, ज्यामुळे ही महिला पोलिसांना चकमा देण्यात जास्त मेहनत न घेता यशस्वी ठरली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ नक्की कुठला आहे हे काही उघड झालेल नाही. परंतु या व्हिडीओला jattwadi.soch या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे. शेअर करताच लोकांनी याला भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स दिले आहेत. लोकांनी या महिल्या युक्तीची प्रशंसा केली, तर एका युजरने या महिलेला 21 तोफांची सलामी दिली आहे.