मुंबई : आयआरसीटीसीचे गुंतवणूकदार सध्या सेलिब्रेशन मोडमध्ये आहेत. कारण कंपनीच्या शेअर्सने जोर धरला आहे. IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) च्या शेअर्समध्ये तेजीचा कल कायम आहे. वर्ष 2019 मध्ये, जेव्हा IRCTC IPO आला, तेव्हा इश्यू किंमत 315-320 रुपये प्रति शेअर होती. आज IRCTC च्या शेअरची किंमत 6 हजार 375.45 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच, स्टॉकने आतापर्यंत 2 वर्षात जवळजवळ 19 पट परतावा दिला आहे.
मंगळवारी IRCTC चे शेअर्स 6 हजार 212 रुपयांवर उघडले. सुरूवातीच्या व्यापारातच तो 8 टक्क्यांनी वाढला आणि शेअरची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकी 6 हजार 375.45 वर पोहोचली. यासह, IRCTC चे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांवर गेले.
IRCTC चा 638 कोटी रुपयांचा IPO 30 सप्टेंबर 2019 ला आला आणि 3 ऑक्टोबर 2019 ला बंद झाला. आयपीओ 112 वेळा सबस्क्राइब झाला. या नंतर IRCTC ने 14 ऑक्टोबर 2019 रोजी शेअर बाजारात प्रवेश केला आणि शेअर 644 रुपयांच्या किंमतीवर सूचीबद्ध केले गेले.
गेल्या 6 महिन्यांत IRCTC चे स्टॉक 293 टक्क्यांनी वाढले आहे. 6 महिन्यांपूर्वी ते 1 हजार 612 रुपयांवर होते. आयआरसीटीसीची बाजार किंमत ऑगस्टपासून 172 टक्क्यांनी वाढली आहे. आयआरसीटीसीच्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. परंतु ज्यांनी ही IRCTCमध्ये लाँग टर्म गुंतवणूक केली होती, त्यांना मात्र याचा फायदाच झाला आहे.