Viral News : बातमी आहे एका व्हायरल व्हीडिओची. तुम्ही फायर हेअरकट (Fire Cut) कधी केलाय का? फायर हेअरकट करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जो व्हीडिओ दाखवणार आहोत तो पाहा. मग व्हिडिओ पाहून विचार करा. कारण, एका तरुणाला फायर हेअरकट करणं महागात पडलंय. असं काय घडलं त्या तरुणासोबत. चला पाहुयात. (viral video watch this video and be careful before fire haircut)
फायर हेअरकट करण्यापूर्वी हा व्हीडिओ पाहा आणि सावध व्हा. अशी चूक जीवावरही बेतू शकते. या तरुणाला फायर हेअरकट करायचा होता. त्यामुळे सलून चालकाने याच्या केसांना केमिकल लावलं आणि केसांना आग लावली. यानंतर केस कापण्यास सुरूवात केली. आपण भाजू नये म्हणून ग्राहकानेही चेहऱ्याला कपडा गुंडाळलाय. पण, सलून चालकाने केस कापायला सुरूवात केली त्यावेळी केसांनी पेट घेतला.
ग्राहकाला आधी वाटलं की हे फायर हेअरकटचाच प्रकार असावा. पण, केस पेटले आणि आगीचा चटका लागू लागले त्यावेळी गडबड झाल्याचं लक्षात आलं. याने केसांना लागलेली आग कपड्याने आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पण, तोपर्यंत याच्या केसांनी पेट घेतला. आगीचा भडका उडाल्याने तरुणाची मान आणि छाती भाजली. हा तरुण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. पण, असे प्रकार जीवावर बेतू शकतात. ही घटना नक्की कुठली आहे. या तरुणाचं पुढे काय झालं याची आम्ही पडताळणी केली.
व्हायरल व्हीडिओ गुजरातच्या वापीतील आहे. केस कापण्यासाठी डोक्याला केमिकल लावण्यात आलं. केमिकलमुळे तरुणाचा शरीराचा वरचा भाग भाजला. जखमी तरुणावर सूरतमध्ये उपचार सुरू आहेत. पीडित तरुण आणि केस कापणाऱ्याचा जवाब नोंदवण्यात आलाय. केस कापण्यासाठी डोक्याला केमिकल लावल्यामुळे आगीने भडका घेतल्याचं समोर आलंय. त्यामुळे केस कापण्यासाठी असे अघोरी प्रकार करण्याचा प्रयत्न करू नका.