भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. यावर पोलिसांनी तिला आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट पाठवलं आहे.

राजीव कासले | Updated: May 23, 2023, 09:34 PM IST
भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले title=

Bride Shoot On Car Bonnet Viral Video: लग्नाआधी (Marriage) प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करणं ही सध्या तरुणाईची फॅशन बनलीये. आताच्या तरुणाईला प्री वेडिंगची भुरळच पडली आहे. प्री-वेडिंग शूटसाठी बराच पैसाही खर्च केला जातो, इतकंच काय तर छान-छान लोकेशनही निवडली जातात. पण काही जणांना काहीतरी हटके करायचं असतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होणाऱ्या या व्हिडिओत एक नवरी मुलगी भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून प्री-वेडिंग शूट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रयागराजचा  (Prayagraj)असल्याचं बोललं जात आहे. या मुलीने लाल रंगाचा लहंगा परिधान केला आहे. पांढऱ्या रंगाच्या कारच्या बोनेटवर बसून ही मुलगी फोटोशूट करताना दिसत आहे. पण असं फोटोशूट करणं तिला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी या मुलीला एक गिफ्ट पाठवलं. हे गिफ्ट पाहून मुलीच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. 

भर रस्त्यात कारवर फोटोशूट करत असल्याने इतर वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. याची तक्रार पोलिसांकडे जाताच पोलिसांनी या मुलीला चलन पाठवलं. पोलिसांनी या मुलीला तब्बल साडेपंधरा हजार रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता. दंडाची रक्कम बघताच मुलीच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलीचं नाव वर्णिका चौधरी असं आहे. याआधी तीने स्कूटीवर हेलमेट न घालता व्हिडिओ शूट केलं होतं. 

लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने (Users) म्हटलंय या मुलीला काहीतरी मानसिक आजार असावा. तर एका युजरने म्हटलंय पोलिसांनी तिला लग्नाचं चांगलंच गिफ्ट दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून हजारोवेळा हा व्हिडिओ पाहिला गेला आहे. 

लग्नात नागिन डान्स
दरम्यान, लग्नातला असाच आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका लग्न समारंभात महिला नागिन डान्स (Nagin Dance) करताना दिसत आहे. भान हरपून ही महिला नाचताना दिसत आहे. इतर महिला तिला आवरण्याचा प्रयत्न करतायत, पण ती महिला कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. या महिलेने केलेला नागीन डान्स पाहून आपल्यालाही हसू आवरणार नाही.