देवदूताची कमाल! अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ; पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले

अमेरिकेतील शॉर्ट-सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे उद्योगपती गौतम अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी पहिल्या 20च्या बाहेर फेकले गेले होते. 

वनिता कांबळे | Updated: May 23, 2023, 09:20 PM IST
देवदूताची कमाल! अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ; पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळाले title=

Gautam Adani Net Worth: अमेरिकास्थित सल्लागार संस्था 'हिंडेनबर्ग रिसर्च'चा (Hindenburg Report) अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाला (Adani Group) जबरजस्त धक्का बसला.  हिंडेनबर्ग रिसर्चनंतर अदानी ग्रुपचा 9 दिवसांत 8 लाख कोटींचा चुराडा झाला. अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या फक्त एका रिपोर्टमुळे अदानी समूहाला जबरदस्त फटका बसला. जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी (Gautam Adani) आऊट झाले. आता मात्र, गौतम अदानी या संकटातून बाहेर पडत आहेत. अदानी यांच्या संपत्तीत एका दिवसात 70 हजार कोटींची वाढ झाली आहे. अदानी यांनी पुन्हा श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

700000000000 कोटींचा चुराडा

हिंडेनबर्ग रिसर्चनं अलिकडेच अदानी उद्योगसमुहाबद्दल एक अहवाल दिला. त्यात अदानी गृपनं आकडे कसे फुगवले हे दाखवून दिलं. या अहवालानं गुंतवणूकदारांचा अदानींवरचा विश्वास उडाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अदानी गृपच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली. अदानी समूहाला 7 लाख कोटींचा फटका बसला. फोर्ब्सच्या 'रिअल टाईम बिलेनियर्स'च्या यादीत एका दिवसातच अदानींची 10 व्या स्थानावरून 15 व्या स्थानी घसरण झालीय.. हिंडनबर्गचा अहवाल येण्याआधी अदानी तिस-या स्थानावर होते.  हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये प्रचंड घसरण झालीय. त्यामुळे अदानी यांच्या संपत्तीत सातत्याने मोठी घट होत राहिले. काही दिवसांतच ते फोर्ब्सच्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 33 व्या स्थानी घसरले होते.

अमेरिकेतील भागीदार आला मदतीला धावून

हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमुळे अडचणीत सापडलेल्या अदानी यांच्या मदतीला त्यांचा अमेरिकेतील एक भागिदार धावून आला आहे. अदानी ग्रुपची ही अमेरिकेतील भागीदार कंपनी अदानी ग्रुपसाठी देवदूत ठरली आहे. GQG ही अदानी ग्रुपची अमेरिकेतील भागीदार कंपनी आहे. GQG ने अदानी ग्रुपमधील गुंतवणूक 10 टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळे अदानी ग्रुपचे शेअर्स 15 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. 

अदानी यांच्या संपत्तीत वाढ

GQG ने अदानी ग्रुपमध्ये गुंतवणुक वाढवल्याने याचा थेट फायदा गौतम अदानी यांना झाला आहे. अदानी यांच्या संपत्तीत एका दिवासांत  70 हजार कोटींची वाढ झाली आहे. मंगळवारी गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 55 अब्ज डॉलरवर पोहोचली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी आता 24व्या स्थानावर आले आहेत.