चालत्या रेल्वेत धोकादायक स्टंट करताना दोन शाळकरी मुले, Video पाहून व्हाल थक्क

Chennai Students Stunt Video:  आजकाल काही लोकांना कमी वेळात प्रसिद्ध होण्याचे वेड आहे. या वेडापाई ते (Chennai Students Video) आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाही.  

Updated: Nov 26, 2021, 09:55 AM IST
चालत्या रेल्वेत धोकादायक स्टंट करताना दोन शाळकरी मुले, Video पाहून व्हाल थक्क  title=

मुंबई : Students Stunt Video:  आजकाल काही लोकांना कमी वेळात प्रसिद्ध होण्याचे वेड आहे. या वेडापाई ते (Chennai Students Video) आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाही. काही लोक धोकादायक स्टंट (Chennai Students Train Stunt) करतात. असा दोन विद्यार्थ्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण स्टंट करताना ते विसरतात की असे केल्याने त्यांचा जीवही जाऊ शकतो. स्टंटमध्ये अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. (Stunt Video of Chennai Students)

सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल हो आहे, (Stunt Viral Video) ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी शाळेचा गणवेश घातलेले धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत. या दोघांचा व्हिडिओ पाहून लोकांची चांगलीच दमछाक होत आहे. हा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये हे दोन्ही शालेय विद्यार्थी चालत्या ट्रेनमध्ये जीवघेणे स्टंट करताना दिसत आहेत. 

असा केला धोकादायक स्टंट

हा व्हिडिओ चेन्नईतील कावरपेट्टाई रेल्वे स्टेशनचा आहे. (Kavarapettai railway station) व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेचा गणवेश घातलेला एक मुलगी आणि मुलगा चालत्या ट्रेनसोबत धावत आहेत. मुलीने ट्रेनचे हँडल धरले आहे आणि मुलगा तिच्या मागे धावत आहे. यानंतर ट्रेनचा वेग वाढल्याने ती मुलगी दरवाजाचे हँडल पकडून प्लॅटफॉर्मवर पाय ओढू लागते. व्हिडिओ पाहा -