केरळ (त्रिशूर) : जगात असे बरेच लोकं आहेत जे त्यांच्या नृत्य, गायन, चित्रकलेसाठी देशातच काय तर परदेशात देखील लोकप्रिय आहेत. लोकं त्यांच्या वेगळ्या आणि अनोख्या कामांमुळे प्रसिद्ध होतात. केरळमधील एका विद्यार्थ्याने तिच्या कलेने अनेक लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. या मुलीचे वैशिष्ट्य म्हणजे ती हात, पाय आणि तोंडाने व्यंगचित्र बनवते. अनेक दिवसांची मेहनत आणि सरावानंतर तिला हे करण्यात यश आले आहे.
त्रिशूर येथे राहाणारी ई.व्ही. दिव्या ही नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी विद्यार्थिनी आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान कंटाळा आल्याने तिला ही युक्ती सुचली. तिने तिच्या ऑनलाईन अभ्यासानंतर कैरिकेचर मेकिंगचा सराव सुरू केला. तशी ती प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, परंतु तिला हे काम उत्तम जमलं आहे.
याबाबत दिव्या म्हणाली, "मी व्यंगचित्र बनवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला त्यात रस निर्माण झाला. मी माझ्या उजव्या हाताने हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो असे मला वाटले. त्यानंतर मी माझा डावा हात देखील यासाठी वापरण्याचा विचार केला आणि लवकरच मी यशस्वीही झाले. त्यानंतर अनेक प्रयत्ना नंतर मी दोन्ही हातांनी व्यंगचित्र काढण्यात यशस्वी झाली. मागच्या वर्षी लॉकडाऊन दरम्यानच्या माझ्या रिकाम्या वेळेत मी हेच केले."
दिव्या पुढे म्हणाली, "यावर्षी मी पुन्हा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या उजव्या पायात मार्कर पेन धरुन लिहायला सुरुवात केली. लवकरच मला समजले की मी हे करू शकतो. त्यानंतर मी डाव्या पायामध्ये आणखी एक मार्कर पेन घेतले आणि व्यंगचित्र काढायला घेतले. त्यात देखील मला यश प्राप्त झाले."
दिव्या म्हणाली, "मग मागच्या महिन्यात मी विचार केला की, तोंडात मार्कर पेन ठेवून का प्रयत्न करु नये. मग मी प्रयत्न केला आणि त्यात यशस्वीही झाले. गेल्या महिन्यापासून मी एकाच वेळेस पाच मार्कर पेन वापरुन आणि व्यंगचित्र काढत आहे."
दिव्याने सांगितले की, तिने पाच मार्कर पेन वापरुन प्रथम अभिनेता जयसूर्या यांचे चित्र काढले.
जेव्हा तिने त्याचे चित्र काढून सोशल मीडियावर शेअर केले, तेव्हा जयसूर्याने तिला प्रत्युत्तर दिले. हे तिच्यासाठी मोठे प्रोत्साहन आहे. आता तिला सुपरस्टार ममूटीचे व्यंगचित्र बनवायचे आहे.