Viral Video : लोक सध्या फास्टफूडमध्ये चायनीज पदार्थ अगदी चवीचवीने खाताना दिसतात. लहान मुलांमध्येही चायनीच खाण्याची प्रचंड आवड आहे. खासकरुन नुडल्स हा प्रकार सर्वानांच आवडतो. नूडल्स आरोग्यासाठी चांगले नाहीत हे माहीत असूनही लोक चवीसाठी आरोग्याला बाजूला ठेवतात आणि नूडल्सचा आस्वाद घेतात. पण हे चायनीज किंवा नुडल्स पोटात जाण्याआधी कसे तयार केले जाते याची अनेकांना कल्पना नसते. पण सोशल मीडियावर नूडल्स बनवण्याआधी तो धुण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा नूडल्स खाण्याआधी नक्कीच काळजी घ्याल.
चायनीच बनवताना वापऱ्यात येणारे नूडल्स धुण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांना नूडल्स आवडतात ते लोक ते खाण्यापूर्वी नक्कीच दोनदा विचार करतील. चायनीजमध्ये नूडल्स देखील सर्वाधिक विकल्या जाणार्या खाद्यपदार्थांपैकी एक आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओमध्ये एक माणूनस नदीच्या काठावर काहीतरी करताना दिसत आहेत. हातात प्लास्टिकचे कॅरेट घेऊन तो माणूस नदीत उतरतो आणि ते पाण्यात बुडवतो. व्हिडीओच्या सुरुवातीला त्याला प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये काय आहे ते समजत नाही. पण तो माणून ते कॅरेट तीन वेळा पाण्यात बुडवून बाहेर काढतो तेव्हा त्यामध्ये शिजवलेले नूडल्स असल्याचे दिसून येतं.
नूडल्स शिजवल्यानंतर थंड पाण्यात टाकून ते चिकटू नयेत यासाठी त्या माणसाने असा प्रकार केल्याचे वाटत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आजूबाजूच्या असलेल्या लोकांमध्ये पर्वा तो माणूस काळ्याकुट्ट पाण्यामध्ये नूडल्स बुचकळून काढत आहे. तिथल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने आश्चर्य व्यक्त केले आहे. आतापर्यंत दोन लाख, 84 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी त्याच्यावर कमेंट करायलाही सुरुवात केली आहे. एका युजरने, तो माणूस नुडल्सला गंगेत आंघोळ घालत आहे, असे म्हटलं आहे. दुसऱ्या एका युजरने, रस्त्यावरचे लोक कोणताही पदार्थ तयार करताना फार अस्वच्छ असतात, असे म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने हे नूडल्स नंतर उकळून तेलात तळले जातात, त्यामुळे जीवाणू जिवंत राहू शकत नाही, असा उपहासात्मक टोला लगावला आहे.