तिरुअनंतपुरम : केरळमधील पलक्कड येथील डोंगरावर सोमवारपासून अडकलेल्या एका तरुणाची आज सकाळी लष्कराच्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. बचावानंतर हा तरुण हेल्मेट घातलेल्या सैन्याच्या कर्मचार्यांसह हसत असल्याचे चित्र दिसले. तसेच या बाचाव कार्याचा व्हिडीओ देखील काढला गेला आहे. ज्यामध्ये जवानांनी त्या तरुणाला कसं सोडवलं हे पाहायला मिळालं आहे. रेस्क्यु करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आर बाबू आहे. त्याची सुटका झाल्यानंतर त्याने लष्कराच्या जवानाचे किस घेतले.
खरेत आपली सुटका झाल्यामुळे आनंदी असलेल्या आर बाबू ने लष्करी जवानाला धन्यवाद देताना त्याचे किस घेलले, ज्यानंतर "भारतीय सेना की जय, भारत माता की जय" असा नारा देत त्या जवानांमध्ये सामील झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्याला लाखो लोकांकडून लाईक्स आणि शेअर केले जात आहे.
आर बाबू सोमवारी दोन मित्रांसह मलमपुझा येथील चेराड टेकडीवर चढला. त्याच्या मित्रांनी प्रयत्न सोडून दिल्यावरही बाबू चढत राहिला आणि माथ्यावर पोहोचला, परंतु तो घसरला आणि दोन खडकांमध्ये अडकला.
आर बाबू डोंगर कड्यावर कुठे अडकला होता याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहिल्या शिवाय राहाणार नाही एवढं मात्र नक्की.
या घटनेची माहिती बाबूच्या मित्रांनी स्थानीक बचाव कर्त्यांना पोहोचवली. ज्यानंतर बंगळुरू पॅराशूट रेजिमेंटल सेंटरच्या संघांची जमवाजमव करण्यात आली होती. परंतु रात्र झाल्यामुळे त्यांना बाबू अडकलेलं ठिकाण ओळखता आलं नाही. परंतु पाहाट होताच त्यांनी ड्रोन आणि बोर्डावरील कॅमेऱ्यांच्या मदतीने विशिष्ट ठिकाण ओळखले आणि कामाला लागले.
"मद्रा रेजिमेंटल टीमच्या दोन अत्यंत कुशल माणसांनी, 250 फूट अंतर खाली उतरुन या तरुण ट्रेकर बाबूपर्यंत पोहोचले आणि एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी बाबूला खाली नेण्याएवजी डोंगराच्या वर खेचले. ज्यामुळे या दोन सदस्यांनी प्रचंड शारीरीक बळाचा वापर करावा लागला.
अधिका-याने नमूद केले की हा भूभाग अतिशय कठीण, उंच आणि झाडे नसलेला होता. ज्यामुळे बाबूला वाचवणे हे कठीण झाले होते. अशा भागातून कोणी खाली पडला तर त्याची वाचण्याची शक्यता फारच कमी असते. कारण कोणालाही तेथे रोखून धरायला काहीच साधन नसते. परंतु बाबू खूप भाग्यवान होता, जो तेथे फटीत अडकला आणि इतका वेळ त्या ठिकाणी राहिला.
मुख्यमंत्री विजयन यांनी बचाव कार्यात सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आणि तरुणाची काळजी घेतली जाईल असे देखील कळवले.