सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत मग काही मजेशीर व्हिडीओ असतात तर काही धक्कादायक अंगावर काटा आणणारे व्हिडीओ असतात. खाण्यापिण्याचे सुद्धा काही एकापेक्षा एक हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात जे पाहून काही वेळी अक्षरशः तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. आतापर्यंत बऱ्याच जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे काहींना आवडलाय तर काहींना प्रचंड संताप आल्याची प्रतिक्रिया समोर येतेय.
स्ट्रीट फूड प्रेमींची एक वेगळीच दुनिया असते. वायरल होणार व्हिडीओ दिल्लीतला आहे एका दुकानदाराने चक्क सामोस्याचं दुकान थाटलंय पण इथे मिळणारे सामोरे वेगळेच निघाले . कधी लोकांना ते आवडतं तर कधी लोकांना रागही येतो. एक नवीन डिश बाजारात आली आहे, जी
दिल्लीतील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने आणली आहे. जे खातात तेच त्याच्या खाण्याची चव सांगू शकतील, परंतु त्याचा रंग खूपच रंगीबेरंगी दिसतो. हा एक समोसा आहे जो स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्लेवर्समध्ये बनवला जातो.
त्याचा व्हिडिओ समोर येताच तो व्हायरल झाला. मात्र त्यावर लोकांनी चान्गलाच तोंडसुख घेतलं अतिशय विचित्र कॉम्बिनेशन असं लोक म्हणत आहेत लोकांमध्ये नाराजी आहे. ''सर्व मर्यादाच सोडली'' असं काही युझर्स म्हणत आहेत. पण ज्यांना हि डिश खावीशी वाटतेय ज्यांना आवडली ते याचा आनंद घेताहेत...