चालत्या ट्रेन समोर रेल्वे रुळावर धावू लागली मुलं... पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही थक्कं व्हाल

कॅनेडियन ट्रान्सपोर्ट कंपनी मेट्रोलिंक्सच्या ट्रेनसमोर दोन अनोळखी मुलं रुळावरून पुढे जाताना दिसतात.

Updated: Jun 2, 2022, 06:28 PM IST
चालत्या ट्रेन समोर रेल्वे रुळावर धावू लागली मुलं... पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही थक्कं व्हाल title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वांच्याच अंगावर काटा येत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन मुलं चलत्या ट्रेनच्या अचानक मधे येतात आणि धावू लागतात. परंतु यानंतर जे घडतं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. अनेक इंटरनेट युजर्स हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

Metrolinux नावाच्या अकाऊंटने हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ टोरंटोचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॅनेडियन ट्रान्सपोर्ट कंपनी मेट्रोलिंक्सच्या ट्रेनसमोर दोन अनोळखी मुलं रुळावरून पुढे जाताना दिसतात. तो रुळांवरून लोकोमोटिव्हकडे पाठीशी धावताना दिसतात.

त्यानंतर तिसरे मूलही रेल्वेपासून दूर बाजूच्या ट्रॅकवर उभे असल्याचा दिसत आहे. व्हिडीओमध्ये आपण धावत असलेल्या एका मुलाने हलका निळा शर्ट आणि हाल्फ चड्डी घातली आहे.

हा व्हिडीओ खरंतर ट्रेनच्या आतून शूट करण्यात आला आहे. जेव्हा ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन धावत होती, तेव्हा दोन मूलं रुळांवरुन पळताना दिसत आहे.

दुसरा मुलगा, जो पांढरा टी-शर्ट आणि चड्डी घालून रुळावर धावत आहे, तो सुरुवातीला त्याच्या मित्रांसोबत रुळांवर धावताना दिसतो, पण नंतर ट्रेन जवळ येताच त्याने रुळावरून उतरण्याचा निर्णय घेतला.

ट्रेनची धडक बसण्यापासून हा मुलगा फक्त एक इंच दूर होता. सध्या, तो कसा तरी ट्रॅकवरून जातो आणि त्याचा जीव वाचवतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तो योग्य वेळी रुळावरून बाजूला झाला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.

ट्विटरवर हा व्हिडीओ 20,000 हून अधिक वेळा पाहिला गेला आहे. असे स्टंट करण्यासाठी जीव धोक्यात घालणाऱ्या मुलांमध्ये जागरूकता नसल्याबद्दल अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केली. 

तथापि, काही वापरकर्त्यांनी असेही निदर्शनास आणले की, शहरांमधील रेल्वे सेवांमध्ये लोकांना ट्रॅकवरून चालण्यापासून रोखण्यासाठी तसेच प्रवासी पूल ओलांडणे सुलभ करण्यासाठी गार्ड रेल असावेत.