वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात.

Updated: Mar 29, 2022, 03:38 PM IST
वेगाने येणाऱ्या ट्रेनजवळ बाईक घेऊन गेलेल्या व्यक्तीसोबत पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे. जेथे आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, जे आपलं मनोरंजन करतात. ज्यामुळे आपला वेळ येथे कसा निघून जातो हे कळत नाही. येथे कॉमेडी आणि डान्स व्हिडीओशिवाय असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, जे आपल्यासाठी उदाहरण ठेवतात. अशाच पद्धतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका बाईक स्वाराचा आहे. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या ट्रेनच्या जवळ असा काही उभा असतो की, त्याला काही फरकच पडत नाही. परंतु ज्यावेळेला तेथून रेल्वेचं इंजीन जातं, ते दृश्य अंगावट काटा आणणारं आहे.

खरंतर ट्रेन येणार म्हणून रस्त्यावरील रेल्वे क्रॉसिंगवर सगळ्या गाड्या रुळापासून लांब थांबल्या होत्या. परंतु एक बाईकस्वार आपल्या जीवाची पर्वा न करता गोणी भरलेल्या सामानासह आपली बाईक घेऊन रेल्वेच्या रुळाजवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा इतर लोक या व्यक्तीला मागे येण्यासाठी सांगत होते परंतु हा व्यक्ती स्वत:चीच मनमानी करतो आणि आहे तेथेच उभा राहातो.

तेवढ्यात तेथून वाऱ्याच्या वेगाने रेल्वेचं इंजिन जातं तेव्हा, तो व्यक्ती वाऱ्याच्या वेगामूळे डगमगतो, परंतु त्याचं नशीब चांगलं होतं, म्हणून त्याला काही झालं नाही. यापूर्वी अशा अनेक घटना घडला आहेत, ज्यामध्ये अशाप्रकारे चुकी केल्यामुळे लोकांचं खूप नुकसान झालं आहे. तर अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

परंतु या व्यक्तीचं नशीब चांगलं होतं की, याचं काहीही नुकसान झालेलं नाही. परंतु त्यानंतर या व्यक्तीसोबत जो प्रकार घडतो तो फारच मनोरंजक आहे. कारण तेथे जो रेल्वेचा व्यक्ती असतो, तो येऊन या व्यक्तीचे कान धरतो. हे दृश्य फारच मनोरंजक आहे. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा की, या व्हिडीओमधून तुम्ही देखील शिकवण घ्या आणि अशी चूक तुम्ही कधीही करु नका.

हा व्हिडीओ memes.bks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.