रस्त्यावरील कुत्र्यानं बाईक स्वाराला असं पळवलं की, त्यानं... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

एक कुत्रा बाईक स्वाराच्या पाठी लागला आहे. ज्यामुळे तो जोरात गाडी पळवतो.

Updated: Mar 28, 2022, 05:02 PM IST
रस्त्यावरील कुत्र्यानं बाईक स्वाराला असं पळवलं की, त्यानं... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ title=

मुंबई : आपण हे बऱ्याचदा पाहिलं किंवा ऐकलं असेल की, रस्त्यावरील कुत्रे हे रात्रीच्या वेळी लोकांच्या मागे लागतात. खाली रस्त्यावर कुत्र्यांचंच राज्य चालतं आणि त्यावेळेला कोणताही व्यक्ती तेथून गेला तर, ते कुत्रे त्या व्यक्तीच्या असे काही मागे लागतात की, बस्सं. एवढंच काय तर अनेक कुत्रे हे बाईक स्वारांच्या मागे देखील लागतात आणि काही मीटर अंतरापर्यंत ते त्यांचा पाठलाग देखील करतात. तुमच्यासोबत देखील असा प्रकार कधी तरी घडला असावा. सध्या या संबंधीत असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बाईक स्वाराच्यापाठी एक कुत्रा लागला. त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक होतं.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा जोरात पळत बाईकस्वाराच्या पाठी लागला आहे आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी तो बाईकस्वार आणखी जोरात गाडी चालवत आहे. परंतु या सगळ्यात बाईक स्वाराकडून एक चूक घडते आणि तो समोर उभ्या असलेल्या कारला जाऊ धडकतो.

कुत्रा मागे लागला असल्यामुळे बाईकस्वाराचं लक्ष कुत्र्याकडे असतं, ज्यामुळे तो समोर उभ्या असलेल्या कारकडे पाहात नाही आणि थेट जाऊन त्या कारला धडक देतो. जे पाहून कुत्रा आपल्या मार्गाने निघून जातो.

हा व्हिडीओ जितका भितीदायक आहे, तितकाच तो मनोरंजक देखील आहे. एखाद्याच्या पाठी कुत्रा लागल्यावर त्याची काय परिस्थीती असेल, हे तर त्या व्यक्तीलाच माहित असते, परंतु त्या व्यक्तीसोबत जे काही घडलं, ते पाहाताना खूपच मनोरंजक दिसत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. बऱ्याच लोकांना या व्हिडीओमुळे आपल्या सोबत घडलेला प्रकार आठवला आहे. ज्यामुळे लोक या व्हिडीओला लाईक आणि कमेंट करत आहेत.

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर cutepuppy542 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत 24 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, सोबतच लोकांनी व्हिडिओ पाहिल्यानंतर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.