ड्रायव्हरने हे पाऊल उचलंल नसतं तर काय घडलं असतं....पाहा व्हायरल व्हिडीओ

अपघात कधी जास्त स्पीडमुळे, कधी निष्काळजीपणामुळे, तर कधी नकळतपणे वाहानात आलेल्या टेक्नीकल गोष्टींमुळे देखील अपघात घडताता. 

Updated: Sep 24, 2021, 04:53 PM IST
ड्रायव्हरने हे पाऊल उचलंल नसतं तर काय घडलं असतं....पाहा व्हायरल व्हिडीओ title=

मुंबई : महामार्गावर किंवा रस्त्यावर दिवसाला एक तरी अपघात घडतोच. हा अपघात कधी जास्त स्पीडमुळे, कधी निष्काळजीपणामुळे, तर कधी नकळतपणे वाहानात आलेल्या टेक्नीकल गोष्टींमुळे देखील अपघात घडताता. परंतु कधी कधी ड्रायव्हरच्या दक्षतेमुळे असे अपघात टाळले ही जातात. जशी ड्रायव्हरची एक छोटी चूक होत्याचं नव्हतं करु शकते, तशीच ड्रयव्हरचं हुशारीने उचलेलं एक पाऊल अनेक लोकांचे प्राण देखील वाचवू शकते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण आहे. ड्रायव्हरची हुशारी, होय कारण या ड्रायव्हरने आपल्या हुशारीने अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. त्याने जर योग्य वेळी योग्य पाऊल उचलले नसते तर रस्त्यावर रक्ताचे पाट वाहू लागले असते.

सोशल मीडिया साईट ट्विटरवर एका हायवेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा असल्याचे सांगितले जात आहे. महामार्गावर वाहने भरधाव वेगाने चालवली जातात, त्यामुळे मधेच जर काही अडचण आली किंवा गाडी थांबली, तर मागील गाड्या या एकमेकांवर आढळतात.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत देखील असेच काहीसे घडले. महामार्गावर अचानक काहीतरी झाल्यामुळे गाड्या अचानक थांबल्या. परंतु मागुन येणाऱ्या जड ट्रकची स्पीड मात्र कमी झाली नाही. त्यामुळे तो बाजूला असलेल्या जागेतुन रस्ताकाढून जात होता. परंतु रस्त्यात थांबलेल्या कारपैकी, एक कार त्या ट्रकच्या रस्त्यात होती. ज्यामुळे हा ट्रक या कारला उडवून पलटी झाला असता ज्यामुळे अनेक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागू शकले असते.

परंतु जी कार त्या ट्रकच्या रस्त्यात होती, त्या कार ड्रायव्हरने योग्यवेळी त्या ट्रकच्या मार्गातून आपली कार हटवले आणि आतल्या बाजूला घेतली. ज्यामुळे खूप मोठा अपघात टळला आहे.

ही संपूर्ण घटना काही सेकंदाच घडली. त्यामुळे विचार करा की, हा फक्त काही सेकंदाचा खेळ होता. एकाची चूक सगळ्या लोकांना किती भारी पडली असती.

सोशल मीडिया साइट ट्विटरवर युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहेत. लोक म्हणतात की, अशा निष्काळजीपणामुळे अपघात होतात. जर गाडी वेळेवर तेथून हटवली नसती तर आत बसलेल्या प्रवाशांचे आणि बाकिच्या लोकांचं काय झालं असतं हे माहित नाही.