धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था

Viral Video: धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. गाजियाबादमधील (Ghaziabad) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकरी त्यावर खडे बोल सुनावत आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली.  

शिवराज यादव | Updated: Jun 22, 2023, 04:43 PM IST
धावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था title=

Viral Video: धावत्या बाईकवर रोमान्स करण्याचा सध्या ट्रेंडच सुरु आहे. अनेक शहरांमध्ये जोडपी रस्त्यावर धावत्या बाईकवर जोडपी अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला असून यावेळी गाजियाबादमध्ये (Ghaziabad) हा प्रकार घडला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवरुन संताप व्यक्त करक आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणी तरुणाला बाईकवर घट्ट मिठी मारुन बसल्याचं दिसत आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, तो सार्वजनिक ठिकाणी असं कृत्य केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त करत आहे. महिला मागे सीटवर बसण्याऐवजी तरुणाच्या मांडीवर बसल्याने ती व्यक्ती संताप व्यक्त करते. सध्याच्या जमान्यात व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही स्तराला जाऊन धक्कादायक स्टंट करत असल्याचंही तो म्हणत आहे. 

व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना या व्हिडीओची दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या जोडप्यानेही दुचाकीवरुन प्रवास करताना सुरक्षेच्या नियमांचं पालन केलेलं दिसत नाही. धोकादायक स्टंट करताना दोघांनीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. 

इतर युजर्सनीही ट्विटरला उत्तर प्रदेश आणि गाजिबायाद पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. "हे गाझियाबाद आहे, येथे नियम आणि कायद्यांना महत्त्व नाही. बघा ही मुलगी मुलगी बाइकस्वाराच्या मांडीवर कशी बसली आहे. टूर ट्रॅव्हल ऑपरेटर सुधांशूने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे,” असं एका युजरने लिहिलं आहे.

गाझियाबादच्या पोलिस उपायुक्तांनी यासंबंधी कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले, "या व्हिडीओ संदर्भात, पोलीस निरीक्षक इंदिरापुरम यांना व्हिडिओची तपासणी करत आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत". 

गाजियाबाद पोलिसांनी जोडप्याला दंड ठोठावला आहे. पोलिसांनी सांगितलं आहे की, ट्विटरवरुन मिळालेल्या तक्रारीवर कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे. संबंधितांना कायदेशीर कारवाईची माहिती देण्यात आली आहे. 

असाच प्रकार काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या अजमेरमध्ये घडला होता. व्हिडीओत जोडपं एकमेकांना मिठ्या मारत असल्याचं आणि किंसिंग करत असल्याचं कैद झालं होतं.