बस वेगात असतानाच ब्रेक झाला फेल, प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, धक्कादायक VIDEO व्हायरल

Haryana Accident: हरियाणात (Haryana) एक भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रोखली. मात्र यावेळी प्रवासी बसमधून बाहेर फेकले गेले.   

शिवराज यादव | Updated: Apr 14, 2023, 03:42 PM IST
बस वेगात असतानाच ब्रेक झाला फेल, प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले, धक्कादायक VIDEO व्हायरल title=

Haryana Accident Viral Video: हरियाणाच्या (Haryana) कैथल जिल्ह्यात गुरुवारी दुपारी हरियाणा रोडवेजच्या (Haryana Roadways) बसचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने यावेळी मोठा दुर्घटना टळली आणि अनेक प्रवाशांचा जीव वाचला. चालकाने बस रोखण्यासाठी चौकातील बांधकामावर बस नेऊन आदळली. यामुळे बस जागीच रोखली गेली आणि मोठा अनर्थ टळला. मात्र बसचा अचानक ब्रेक दाबण्यात आल्याने प्रवासी बसच्या बाहेर फेकले गेले. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

बस धावत असतानाच चालकाला बसचे ब्रेक फेल झालं असल्याचं लक्षात आलं. यानंतर त्याने बस थांबवण्यासाठी चौकात उभ्या बांधकामावर नेऊन ती आदळली. व्हायरल व्हिडीओत यानंतर काही प्रवासी पुढच्या काचेतून खाली रस्त्यावर पडताना दिसत आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

दरम्यान बसचंही मोठं नुकसान झालं आहे. अपघातानंतर बसचा टायर निघाला होता. तसंच टाकीतून पेट्रोल गळू लागलं होतं. अपघातानंतर गर्दी केलेल्या लोकांनी ताबडतोब सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. यामुळे जास्त प्रवासी जखमी झालेले नाहीत. रस्त्यावर उभ्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा रोडवेजची बस सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास बस स्टँडहून चिकासाठी निघाली होती. बस विश्वकर्मा चौकात पोहोचताच चालकाला ब्रेक लागत नसल्याचं लक्षात आलं. 

यानंतर चालकाने प्रसंगावधान दाखवत बस भिंतीवर आदळली. यानंतर बस जागेवरच थांबली. रोडवेजचे जनरल मॅनेजर अजय गर्ग यांनी सांगितलं की, अपघाताची माहिती मिळताच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवण्यात आलं. सर्व प्रवासी आणि चालक सुरक्षित आहे. दरम्यान अपघाताची चौकशी होणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.